धोनीच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का.! थाला आयपीएल 2026 मधून बाहेर? थक्क करणारे कारण समोर
आयपीएल 2026 ची सुरुवात आज होत आहे. स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील एका रोमांचक लढतीने रंगणार आहे. क्रिकेटप्रेमींसाठी, हा सामना अत्यंत चुरशीचा आणि उत्कंठावर्धक ठरेल अशी अपेक्षा आहे.
मात्र, एमएस धोनीच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्नायूंच्या दुखापतीमुळे (Calf injury), धोनी सध्या पुनर्वसन प्रक्रियेतून जात असून, त्याच्या पूर्णपणे तंदुरुस्त होण्यावरच सध्या मुख्य लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अधिकृत अहवालांनुसार, या दुखापतीमुळे आयपीएल 2026 च्या सुरुवातीच्या टप्प्यात धोनीला मैदानात उतरता येणार नाही. विशेषतः, स्पर्धेच्या पहिल्या दोन आठवड्यांतील सामन्यांना तो मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सुरुवातीच्या सामन्यांमध्ये धोनीसारख्या अनुभवी खेळाडूची अनुपस्थिती संघासाठी एक मोठे आव्हान ठरू शकते. धोनीच्या गैरहजेरीत संघाची रणनीती आणि नेतृत्व कशा प्रकारे परिस्थितीशी जुळवून घेईल, याकडेच आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
बातमी अपडेट होत आहे…
Comments are closed.