चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, 2017 च्या चॅम्पियन संघातील 3 खेळाडूंचा समावेश

पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी संघ जाहीर केला आहे. बाबर आझमसोबत मोहम्मद रिझवानचाही संघात समावेश करण्यात आला आहे. रिझवानवर मोठी जबाबदारी आली आहे. तो स्पर्धेत संघाचे नेतृत्व करेल. अनुभवी खेळाडू फखर झमान देखील संघाचा भाग आहे. सलमान अली आगा आणि उस्मान खान यांनाही संधी देण्यात आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 19 फेब्रुवारीपासून सुरू होईल. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना 23 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी संध्याकाळी संघाची घोषणा केली. पाकिस्तानने 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. आता संघ पुन्हा एकदा जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. पाकिस्तान या स्पर्धेचे आयोजन करत आहे. तर भारतीय संघ त्यांचे सर्व सामने दुबई, यूएई येथे खेळेल.

पाकिस्तान संघ बराच संतुलित दिसत आहे. अनुभवी खेळाडू बाबर आझम आणि फखर झमान हे संघाचा भाग आहेत. फखर जमानने पाकिस्तानकडून 82 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने 3492 धावा केल्या आहेत. त्याने एक द्विशतकही झळकावले आहे. कामरान गुलाम आणि सौद शकील यांनाही संघात स्थान मिळाले आहे. फहीम अश्रफ हा देखील पाकिस्तान संघाचा भाग आहे.

पाकिस्तानची गोलंदाजी यूनिट खूपच घातक आहे. शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह हे संघाचा भाग आहेत. शाहीनबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 59 एकदिवसीय सामन्यांमध्ये 119 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्यासोबत हरिस रौफ आणि मोहम्मद हसनैन यांनाही स्थान मिळाले आहे. फिरकी गोलंदाज अबरार अहमद देखील या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी पाकिस्तान संघ: मोहम्मद रिझवान (कर्णधार), बाबर आझम, फखर जमान, कामरान गुलाम, सौद शकील, तय्यब ताहिर, फहीम अश्रफ, खुशदिल शाह, सलमान अली आघा, उस्मान खान, अबरार अहमद, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी.

पाकिस्तानचे गट टप्प्यातील सामने –

19 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, कराची
23 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई
27 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश, रावळपिंडी

हेही वाचा-

IND vs ENG; स्वप्नवत कामगिरी..! पदार्पणाच्या सामन्यात हर्षित राणानंं रचला इतिहास
IND vs ENG; पुण्यात भारतानं इंग्लंडला लोळवलं, पांड्या-दुबेची झंझावती खेळी, मालिका खिश्यात..!
रणजी ट्रॉफीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं, या संघाच्या नावे लज्जास्पद विक्रमाची नोंद

Comments are closed.