IND vs ENG; शतक झळकावताच शुबमन गिलने इतिहास घडवला, भारताचा नवा स्टार..!
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आधी युवा भारतीय फलंदाज शुबमन गिल फॉर्ममध्ये परतला आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या बॅटमधून खूप धावा येत आहेत. तो एकदिवसीय मालिकेत भारतीय संघासाठी सर्वात मोठा हिरो असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांना धो धो धुतले. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याचे फॉर्ममध्ये पुनरागमन हे टीम इंडियासाठी चांगले संकेत आहे.
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शुबमन गिलने डावाच्या सुरुवातीपासूनच शानदार फलंदाजी केली. त्याने 102 चेंडूत 14 चौकार आणि तीन षटकारांसह 112 धावा केल्या. त्याने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सातवे शतक झळकावले. विशेष म्हणजे गिलच्या एकदिवसीय कारकिर्दीतील हा 50 वा एकदिवसीय सामना होता. तो त्याच्या 50 व्या एकदिवसीय सामन्यात शतक करणारा पहिला भारतीय ठरला. त्याच्या आधी कोणत्याही भारतीय फलंदाजाला अशी कामगिरी करता आली नव्हती.
शुबमन गिलने 2020 मध्ये भारतीय संघासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तो टीम इंडियाच्या फलंदाजी क्रमातील एक महत्त्वाचा दुवा बनला. 2023 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातही त्याने द्विशतक झळकावले होते. यानंतर तो सतत टीम इंडियाचा भाग राहिला आहे. आतापर्यंत त्याने टीम इंडियासाठी 50 एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण 2587 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने 7 शतके आणि 15 अर्धशतके झळकावली आहेत.
याशिवाय शुबमन गिल हा एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद 2500 धावा करणारा फलंदाज देखील ठरला आहे. त्याने 50 डावांमध्ये ही कामगिरी केली. याशिवाय, गिल हा असा भारतीय फलंदाज आहे ज्याने सर्वात कमी डावात 7 एकदिवसीय शतके केली आहेत. त्याने शिखर धवनचा विक्रम मोडला आहे. धवनने 54 एकदिवसीय डावांमध्ये 7 शतके केली होती.
सर्वात कमी डावात 7 एकदिवसीय शतके करणारा भारतीय फलंदाज:
शुबमन गिल -50
शिखर धवन -54
विराट कोहली – 63
केएल राहुल -66
हेही वाचा-
ICC वनडे रँकिंग: गिल चमकला, विराटची मोठी घसरण, रोहितचेही नुकसान
CT 2025; भारत-पाकिस्तानसह मोठ्या संघांना धक्का, या 9 खेळाडूंची ट्रॉफीपूर्वी एक्झिट
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी अफगाणिस्तानला मोठा धक्का, फिरकी हुकमी एक्का बाहेर!
Comments are closed.