डेव्हिड मिलरने रचला इतिहास, एबी डिव्हिलियर्स-फाफ डु प्लेसिस जवळपासही नाही

दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड मिलरने एक नवीन विक्रम रचला आहे. आजपर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या कोणत्याही खेळाडूला जे काम करता आले नाही ते डेव्हिड मिलरने करून दाखवले आहे. एबी डिव्हिलियर्स आणि फाफ डु प्लेसिससारखे दिग्गज खेळाडूही डेव्हिड मिलरपेक्षा खूप मागे आहेत. डेव्हिड मिलर हा टी20 क्रिकेटमध्ये 500 षटकार मारणारा पहिला दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज ठरला आहे.

डेव्हिड मिलर सध्या दक्षिण आफ्रिकेच्या टी20 लीग SA20 मध्ये खेळत आहे. ज्यात त्याचा संघ पर्ल रॉयल्स आहे. जो आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सच्या मालकीचा आहे. SA20 मध्ये एमआय केपटाऊन विरुद्ध खेळताना डेव्हिड मिलरने टी20 क्रिकेटमधील त्याचा 500 वा षटकार मारला. याआधी त्याने 499 षटकार मारले होते. जर त्याने चांगली कामगिरी केली तर तो ही नवीन उंची गाठेल अशी अपेक्षा होती आणि नेमके हेच घडले. विशेष म्हणजे त्याने अफगाणिस्तानचा खेळाडू आणि एमआय केपटाऊनचा कर्णधार रशीद खानच्या चेंडूवर हा षटकार मारून विक्रम रचला आहे.

टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांबद्दल बोलायचे झाल्यास, तर आता डेव्हिड मिलर 500 षटकार मारून पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर एबी डिव्हिलियर्स आहे, ज्याने टी20 क्रिकेटमध्ये 436 षटकार मारले आहेत. क्विंटन डी कॉकने आतापर्यंत टी20 मध्ये 432 आणि फाफ डु प्लेसिसने 416 षटकार मारले आहेत.

टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू

डेव्हिड मिलर: 518 सामन्यात 500 षटकार
एबी डिव्हिलियर्स: 340 सामन्यात 436 षटकार
क्विंटन डी कॉक: 379 सामन्यात 432 षटकार
फाफ डू प्लेसिस: 403 सामन्यात 416 षटकार

डेव्हिड मिलर 500 षटकार मारणारा जगातील 10 वा खेळाडू ठरला आहे. याआधी ख्रिस गेल, किरॉन पोलार्ड आणि आंद्रे रसेल सारख्या खेळाडूंनीही हा चमत्कार केला आहे. या फॉरमॅटमध्ये 1000 हून अधिक षटकार मारणारा ख्रिस गेल हा जगातील एकमेव खेळाडू आहे. त्याच्या षटकारांची संख्या 1056 वर पोहोचली आहे.

हेही वाचा-

IND VS ENG; चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी रोहित विराटला फाॅर्ममध्ये परतण्याची शेवटची संधी, नाहीतर….
नागपुर पोलिसांचा खाक्या! थेट टीम इंडियाच्या सदस्यालाच संघासोबत सामील होताना थांबवले!
नशीब उजळले..! ‘हा’ खेळाडू होणार आयपीयल विजेत्या संघाचा कर्णधार;

Comments are closed.