ब्रेकिंग न्यूज.! टी20 वर्ल्ड कप 2026 साठी टीम इंडियाची घोषणा; शुबमन गिलची उचलबांगडी?

टी20 वर्ल्ड कप 2026 साठी भारतीय क्रिकेट संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया आणि निवडकर्ता अजित अगरकर यांनी पत्रकार परिषदेत संघ जाहीर केला. या स्पर्धेसाठी स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून अक्षर पटेल उपकर्णधार असेल. आगामी टी20 वर्ल्डकपला 07 फेब्रुवारीला सुरुवात होईल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने 2024चा टी20 विश्वचषक जिंकला होता.

संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल राखण्यात आला आहे. फलंदाजीची धुरा अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यावर असेल. यष्टिरक्षणाची जबाबदारी संजू सॅमसन आणि ईशान किशन सांभाळतील. अष्टपैलू म्हणून वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांना संधी देण्यात आली आहे.

गोलंदाजी विभागात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा तर फिरकीत वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांचा समावेश करण्यात आला आहे.

नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत भारतीय संघाने शानदार कामगिरी केली. संघाने 3-1 ने 5सामन्यांची टी20 मालिका जिंकली. या मालिकेत तिलक वर्माने सर्वाधिक धावा तर वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. टी20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडिया 21 जानेवारीपासून न्यूझीलंडशी टी20 मालिकेत भिडणार आहे.

टी20 वर्ल्ड कप 2026 साठी आणि न्यूझीलंड टी20 मालिकेसाठी भारतीय संघ:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), ईशान किशन (यष्टिरक्षक), तिलक वर्मा, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह

Comments are closed.