चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सूर्यकुमार यादवला संधी का मिळावी? जाणून घ्या मोठी कारणे

आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला 19 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानात करण्यात आले आहे. पण टीम इंडिया त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहे. सर्व देशांना 12 जानेवारीपर्यंत त्यांचे संघ जाहीर करावे लागणार आहेत. अशा परिस्थितीत भारतीय संघाची घोषणाही लवकरच केली जाईल. टीम इंडियाचा टी20 कर्णधार सूर्यकुमार यादव आतापर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये स्वतःला सिद्ध करू शकलेला नाही. पण सूर्याला भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात का ठेवावे याची 3 कारणे जाणून घेऊयात.

अनुभवी खेळाडू

34 वर्षीय सूर्यकुमार यादवने आतापर्यंत भारतासाठी 37 एकदिवसीय सामन्यांमध्ये 4 अर्धशतकांसह फक्त 773 धावा केल्या आहेत. तो अद्याप या फॉरमॅटमध्ये आपली छाप सोडू शकलेला नाही. पण सूर्या हा खूप अनुभवी खेळाडू आहे. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून ते देशांतर्गत क्रिकेटपर्यंत चांगला अनुभव आहे. त्याचा अनुभव भारतासाठी उपयुक्त ठरू शकतो.

मैदानावर त्याचे 100 टक्के देतो

सूर्यकुमार यादव हा असा खेळाडू आहे जो मैदानावर आपले मनापासून काम करतो. तो फलंदाजी करत असो किंवा क्षेत्ररक्षण करत असो, तो प्रत्येक गोष्टीत आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. तो नेहमीच संघाला स्वतःपुढे ठेवतो. ज्याचे उत्तम उदाहरण म्हणजे टी20 वर्ल्ड कपमध्ये तो घेतलेला झेल.

संघ खेळाडू

सूर्यकुमार यादव हा एक संघ खेळाडू आहे. जो फलंदाजीच्या क्रमाने कुठेही फलंदाजी करू शकतो. गरज पडल्यास, सूर्या टॉप ऑर्डरमध्ये म्हणजेच तिसऱ्या क्रमांकावर देखील फलंदाजी करू शकतो. तो केवळ मधल्या फळीतच खेळत नाही, तर जर संघाने त्याला एकदिवसीय सामन्यात फिनिशरची भूमिका दिली तर ते पूर्ण करण्याची त्यात क्षमता आहे.

हेही वाचा-

SA20: 28 वर्षीय खेळाडूचा पहिल्याच सामन्यात जलवा, मलिंगा-बुमराच्या खास क्लबमध्ये प्रवेश
‘अनादरपूर्ण वागणूक आणि अपमान…’, आर अश्विनच्या निवृत्तीवर माजी क्रिकेटपटूची खळबळजनक प्रतिक्रिया
Champions Trophy; इंग्लंडनंतर आता आफ्रिकेची अफगाणिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी

Comments are closed.