WPL FINAL; दिल्ली समोर मुंबईचं कडवं आव्हान, अंतिम सामन्यात कोणाचं पारड जड?

WPL FINAL 2025; MI vs DC: महिला प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघ एकमेकांसमोर येतील. तत्पूर्वी, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने एलिमिनेटरमध्ये गुजरात जायंट्सचा 47 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. तर, दिल्ली कॅपिटल्स, टेबल टॉपर असल्याने, अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ बनला. आता उद्या शनिवारी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात अंतिम सामना होईल. महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचा रेकॉर्ड कसा राहिला आहे? या जेतेपदाच्या सामन्यात कोणत्या संघाचं पारड जड आहे?

खरं तर, आकडेवारीवरून असे दिसून येते की महिला प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सचा दबदब राहिला आहे. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये अंतिम फेरीत सामना झाला. त्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 7 विकेट्सने पराभव केला. यानंतर, दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या सत्राच्या अंतिम फेरीत पोहोचले. पण त्यावेळी स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा 8 विकेट्सने पराभव केला. शिवाय, आता दिल्ली कॅपिटल्सने सलग तिसऱ्या हंगामात अंतिम फेरी गाठली आहे.

आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्सला दोन्ही वेळा अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर, पहिल्या सत्रात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून मुंबई इंडियन्स चॅम्पियन बनले. आता प्रश्न असा आहे की, दिल्ली कॅपिटल्स अंतिम सामन्यात पराभवाची मालिका टाळू शकेल का? हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स दुसऱ्यांदा महिला प्रीमियर लीग विजेता बनेल का? तथापि, या हंगामात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स दोनदा एकमेकांसमोर आले आहेत. ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने दोन्ही वेळा मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. अश्या परिस्थितीत अंतिम सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.

Comments are closed.