बाईकस्वाराला कारने उडवलं, हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या बहाण्याने गाडीत टाकलं अन् पुलावरुन ढकलून दि
नागपूर गुन्हा: दुचाकीवरील कामगाराला धडक देऊन जखमी केल्यानंतर एका कारचालकाने असंवेदनशीलतेचा कळसच गाठला. जखमीला रुग्णालयात नेण्याच्या बहाण्याने कारमध्ये टाकले व काही अंतरावर पुलाखाली फेकून दिले. वेळेवर उपचार न मिळाल्याने कामगाराचा मृत्यू झालाय. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री ही घटना घडलीय. कृष्णा बुलसे असे मृत कामगाराचे नाव असून बांधकाम कामगार असलेले रुपेश वाकळे आणि कृष्णा बुलके हे दोघेही गुमगाव येथे बांधकामाच्या ठिकाणी भेट द्यायला गेले होते. तेंव्हा ही घटना घडली आहे. जखमी झालेले दोन्हीही कामगार रुग्णालयात नसल्याचे उघड झाल्यानंतर शोधाशोध झाली. पोलीसांना घटनेची माहिती देण्यात आली तेंव्हा चिंचभुवन पुलाखाली पहाटे चारच्या सुमारास कामगार निपचीत पडलेला दिसला. तेंव्हा ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण नागपूर शहर हादरले आहे. (Nagpur Crime)
नक्की काय झाले?
सोमवारी सायंकाळी आठ वाजता बांधकाम कामगार असलेले कृष्णा बुलके आणि रुपेश वाकळे दुचाकीने परत जात होते. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटजवळ एका पांढऱ्या रंगाच्या भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात कृष्णा जखमी झाले व त्यांच्या डोक्याला मार बसला होता. तेथे नागरिकांची गर्दी जमल्याने कारचालकाने उपचाराच्या बहाण्याने कृष्णाला कारमध्ये टाकले. मात्र चिंचभुवन पुलाजवळ गेल्यावर त्याने कार खाली घेतली व कृष्णाला कारमधून फेकून दिले. त्यानंतर कारचालक तेथून फरार झाला. या घटनेमुळे संपूर्ण नागपूर हादरले आहे.
दरम्यान रुपेशने पोलिसांना फोनवर झालेल्या अपघाताची माहिती दिली होती. पोलिसांनी शोधाशोध केली असता जखमी कृष्णा मेयो, मेडिकल, एम्स किंवा इतर कुठल्याही रुग्णालयात दाखल नसल्याची बाब समोर आली. पोलीस त्याचा शोध घेत असताना पहाटे चार वाजताच्या सुमारास चिंचभुवन पुलाखाली ते निपचित पडलेला आढळला. पोलिसांनी त्यांना इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने अखेरचा श्वास घेतला. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी कारचालकाचा शोध सुरू केला आहे. त्यासाठी विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पडताळले जात आहे.
हेही वाचा:
अधिक पाहा..
Comments are closed.