पाशवी बहुमत, दिल्लीत बापजादे, तरी फडणवीसांना भ्रष्ट मंत्र्यांना काढता येत नाही; उद्धव ठाकरे

उधव ठाकरे: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आम्हाला असं वाटलं होतं की ते भाजपची परंपरा चालवतील. पुराव्यानिशी आरोप केल्यानंतर चौकशी करायची देखील गरज नाही त्यावेळी मंत्र्यांची हकालपट्टी केली जाईल, अशी आम्हाला अपेक्षा होती. मात्र मुख्यमंत्री सांगतात की आम्ही त्यांना समज दिली. ही कुठली समज? म्हणजे पुढच्या वेळेला रमी नव्हे तर तीन पत्ती खेळ, पुढच्या वेळेला बार सावली नव्हे तर भर उन्हामध्ये बांध, पुढच्यावेळी बॅग उघडी नव्हे तर बंद करून ठेव, असा हा प्रकार आहे. हे काही योग्य नाही. जर तुम्ही भ्रष्टमंत्र्यांना समज देऊन सोडून देणार असाल तर आमच्या उपराष्ट्रपतींचा राजीनामा घेऊन त्यांना तात्काळ वनवासात का पाठवलं? उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) सध्या कुठे आहेत? त्यांनी राजीनामा नेमका का दिला? असा सवाल करत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. पाशवी बहुमत असतानादिल्लीत बापजादे बसले असताना मुख्यमंत्री फडणवीसांनाही जर भ्रष्ट मंत्र्यांना काढता येत नाही, तर त्यांच्यावर नेमका दबाव आहे तरी कोणाचा? असा प्रियेएल करत उद्धव ठाकरेंनी सरकारकर हल्लाबोल केलाय?

https://www.youtube.com/watch?v=k6tqauxrwwi

आणखी वाचा

आणखी वाचा

Comments are closed.