तामिळनाडूमध्ये 9 ठिकाणी निया छापा

रामलिंगम हत्याप्रकरणी तपास

वृत्तसंस्था/चेन्नई

2019 मध्ये झालेल्या रामलिंगम हत्याप्रकरणी एनआयएने तामिळनाडुत 9 ठिकाणी छापे टाकले अहेत. डिंडीगुल आणि तेनकासी जिल्ह्यांमध्ये छापे टाकत फरार गुन्हेगारांचा शोध घेण्याचा प्रयत्न एनआयएने केला आहे. याचबरोबर एनआयएने प्रतिबंधित संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या सदस्याला अटक केली आहे. एनआयएने एसडीपीआय पदाधिकारी शेख अब्दुल्लाच्या बेगमपूर येथील आणि युसूफच्या ओ•ंचत्रम येथील निवासस्थानी तसेच बटलागुंडु येथे अमर या फरार आरोपीच्या ठिकाणांवर छापे टाकले. अशाचप्रकारे तेनकासीमध्येही कारवाई करण्यात आली आहे.

कोडईकनाल येथील अंबुर बिर्याणी हॉटेल्सचा मालक इम्थातुल्लाहला फरार गुन्हेगारांना आश्रय दिल्याप्रकरणी अटक केली आहे. डिंडीगुल आणि तेनकासीमध्ये  झालेल्या छापेमारीदरम्यान अनेक आक्षेपार्ह दस्तऐवज आणि डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. इम्थातुल्लाहने तीन आरोपींना आश्रय दिला होता. यातील दोन आरोपी अब्दुल मजीद आणि शाहुल हमीदला एनआयएने जानेवारीत अटक केली होती. तर एक आरोपी मोहम्मद अली जिन्ना अद्याप फरार आहे. कुंभकोणम येथील रहिवासी अन् पीएमकेचे पदाधिकारी रामलिंगम यांची 2019 साली तंजावुर येथे हत्या करण्यात आली होती. रामलिंगम यांनी कथित स्वरुपात मुस्लीम संघटनांच्या धार्मिक प्रचाराला विरोध केला होता. याचमुळे त्यांची हत्या करण्यात आली होती. ऑगस्ट 2019 मध्ये एनआयएने याप्रकरणी चौकशी सुरू केली होती.

Comments are closed.