प्रियांका चोप्राच्या गाण्यावर निक जोनासने केला जबरदस्त डान्स, इन्स्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ…

सध्या सोशल मीडियावर धुरंधर चित्रपटाच्या गाण्यांवर सगळेच रील्स बनवत आहेत. अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती निक जोनास यानेही या गाण्याचा रील शेअर केला होता. दरम्यान, आता निकने त्याच्या पत्नीचा गाण्यावर डान्स करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
निक जोनासने त्याची पत्नी प्रियांका चोप्राच्या 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकवर मजेदार स्टाईलमध्ये डान्स केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना निकने कॅप्शनमध्ये लिहिले – “दुसरा शो म्हणजे मुलांना माझ्या आवडत्या हिंदी गाण्यांबद्दल शिकवण्यासाठी आणखी एक रात्र.”
अधिक वाचा – दृष्यम 3 मध्ये अक्षय खन्नाच्या जागी जयदीप अहलावत, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शूटिंग सुरू होईल…
या कॅप्शनसोबत निक जोनासने #mujhseshadikarogi असेही लिहिले आहे. प्रियांका चोप्राने तिच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटातील अभिनेता सलमान आणि अक्षयनेही प्रतिक्रिया दिली आहे.

Comments are closed.