…अन् तिची राष्ट्रीय निवडीतून माघार

मानसिक आरोग्याबाबतच्या समस्यांमुळे पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघातील अनुभवी खेळाडू, माजी कर्णधार निदा दार हिने राष्ट्रीय निवडीतून तिचे नाव मागे घेतले आहे. याबाबत दार हिने शुक्रवारी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली असून, अशा स्वरूपाची घटना प्रथमच घडल्याने पाकिस्तान क्रिकेटला धक्का बसला आहे.

‘गेल्या काही महिन्यांत माझ्या आजूबाजूला वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्टय़ा खूप काही घडले आहे. त्याचा माझ्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत, मी स्वतःवर लक्ष पेंद्रित करण्यासाठी क्रिकेटमधून काही काळासाठी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी सर्वांना विनंती करते की, या काळात माझ्या गोपनीयतेचा आदर करावा’, असा संदेश निदा हिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) तिच्या परिस्थितीची माहिती दिल्याचेही तिने सांगितले.

Comments are closed.