U19 WOMEN'S WC; क्रिकेट विश्वात मोठा अपसेट! नायजेरियाने न्यूझीलंडला हरवले

क्रिकेट जगतात अनेक वेळा चाहत्यांनी मोठे उलथापालथ पाहिले आहे. महिला अंडर-19 विश्वचषकादरम्यान खेळल्या गेलेल्या एका सामन्यादरम्यानही असेच काहीसे घडले आहे. नायजेरियन संघाने न्यूझीलंडच्या महिला संघाला पराभूत केले आहे. हा सामना खूपच रोमांचक झाला. नायजेरियाने हा सामना फक्त 2 धावांनी जिंकला. हा विजय क्रिकेटमधील सर्वात मोठ्या अपसेटपैकी एक आहे. नायजेरियन संघ पहिल्यांदाच अंडर 19 महिला टी20 विश्वचषक खेळत आहे. ज्यात त्यांनी न्यूझीलंडसारख्या मोठ्या संघाला पराभूत केले आहे.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यावर पावसाचा परिणाम झाला. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये फक्त 13-13 षटके खेळवण्यात आली. नायजेरियाकडून कर्णधार लकी पेटीने 22 चेंडूत 18 धावा केल्या तर लिलियन उदेहने 25 चेंडूत 19 धावा केल्या. या दोन डावांच्या जोरावर नायजेरियाने 13 षटकांत 6 गडी गमावून 65 धावा केल्या.

66 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खूपच खराब झाली. डावाच्या पहिल्याच चेंडूवर नायजेरियाला यश मिळाले. केट इरविन धावबाद झाली. यानंतर, तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एम्मा मॅकलिओड देखील 3 धावा काढून बाद झाली. परिणामा संघाने अवघ्या 13 चेंडूत 7 धावा करून दोन्ही सलामीवीर गमावले. त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी जोरदार झुंज दिली पण संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.

न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर नायजेरियाच्या खात्यात तीन गुण झाले आहेत आणि संघ ग्रुप-क च्या पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.

हेही वाचा-

टीम इंडियामधून वगळल्यानंतर मोहम्मद सिराज या संघाकडून खेळण्याची शक्यता
IND VS ENG; ‘जियो किंवा सोनी’वर नाही, या ठिकाणी पाहा लाइव्ह सामना
मोहम्मद शमी पूर्णपणे तंदुरुस्त? सरावादरम्यान गुडघ्याला बांधली पट्टी; पाहा VIDEO

Comments are closed.