वर्ल्ड कपमध्ये मोठा उलटफेर; अठराविश्व दारिद्य्र असलेल्या नायजेरियाच्या पोरींनी न्यूझीलंडला हरवल

नायजेरिया विरुद्ध न्यूझीलंड T20 विश्वचषक 2025 : क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटले जात नाही. त्याचे नवीनतम उदाहरण आयसीसी अंडर 19 महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये दिसून आले. आफ्रिका हा पृथ्वीवरील सर्वात गरीब खंड आहे. ज्यामध्ये नायजेरिया देश येतो, त्यांच्या महिला संघाने क्रिकेट विश्वात इतिहास रचला आहे.

खरंतर, नायजेरिया पहिल्यांदाच 19 वर्षांखालील महिला वर्ल्ड कप खेळत आहे, आणि त्यांनी न्यूझीलंडसारख्या मोठ्या संघाला पराभूत केले आहे. नायजेरियाने हा सामना फक्त 2 धावांनी जिंकला. हा क्रिकेटमधील सर्वात मोठ्या अपसेटपैकी एक आहे.

न्यूझीलंड आणि नायजेरिया यांच्यात झालेल्या या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात पावसाने खोडा घातला, त्यामुळे दोन्ही संघांमध्ये फक्त 13-13 षटके खेळवण्यात आली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना नायजेरियन संघाने 13 षटकांत 6 गडी गमावून 65 धावा केल्या. प्रत्युत्तरात, न्यूझीलंड संघाला 13 षटकांत 6 गडी गमावल्यानंतर फक्त 63 धावा करता आल्या आणि नायजेरियाने 2 धावांनी सामना जिंकला.

पॉइंटटेबल मध्ये थेट पहिला स्थानावर

19 वर्षांखालील महिला वर्ल्ड कपमध्ये नायजेरियन संघ गट क मध्ये आहे. न्यूझीलंड व्यतिरिक्त, त्यांच्या गटात सामोआ आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ आहेत. या गटात नायजेरियन संघ पहिल्या क्रमांकावर आला आहे. त्याने दोन पैकी एक सामना जिंकला आहे. त्याच वेळी, त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला. तीन गुणांसह त्याचा संघ पहिल्या स्थानावर आला आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी एक सामना जिंकला आहे, त्याचे दोन गुण आहे.

हे ही वाचा –

Mohammed Shami Ind vs Eng T20 Match : देखो वो आ गया! 14 महिन्यानंतर टीम इंडियात परतला ढाण्या वाघ; थेट कोचच्या पडला गळ्यात, पाहा Video

Mohammed Shami : BCCIने लंगड्या घोड्यावर खेळला मोठा डाव; स्टार खेळाडू लंगडत ड्रेसिंग रूममध्ये, पहिल्या सामन्यातून बाहेर?

अधिक पाहा..

Comments are closed.