निलंगा तालुक्यात दोन शेतकऱ्यांच्या सोयाबीन गंज्जी अज्ञातांनी जाळल्या, लाखो रुपयांचे नुकसान

सध्या ऐन दिवाळीच्या तोंडावर हाता तोंडाशी आलेल्या खरीप पिकांचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालेले असताना त्यातच मजुरांचीही बेभाव मजुरी देऊन जमा केलेले निलंगा तालुक्यातील मौजे बोरसुरी आणि ताडमुगळी येथील दोन शेतकऱ्यांच्या सोयाबीन गंज्जी जाळुन शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम अज्ञातांनी केले.
निलंगा तालुक्यातील मौजे बोरसुरी येथील सुमनबाई व सिद्धार्थ बाबुराव सूर्यवंशी यांच्या नावे असलेल्या बोरसुरी येथील 6 एकर मधील सोयाबीन काढून जमा केलेली बनिम कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री पेटवली. त्यामुळे अंदाजे 80 कट्टे सोयाबिन जवळपास तीन लाखांचे नुकसान झाले आहे. तसेच मौजे ताडमुगळी येथील शेतकरी गुंडेराव माधवराव गवंडगावे यांच्या जमिन सर्वे नंबर 179 मौजे मधील सोयाबीन काढून बनिम लाऊन ठेवलेली असतानाही कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री जाणुन बुजुन जाळुन टाकली आहे. त्यामुळे एकाच रात्रीतुन दोन शेतकऱ्यांच्या सोयाबीन बनिमीच्या गंज्जी जाळुन शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम करणाऱ्या लोकांवर कोण कारवाई करेल व या शेतकऱ्यांना कशी नुकसानभरपाई मिळेल हे संकट उद्भवलेले आहे.ऐन दिवाळीच्या तोंडावर मोठी आर्थिक टंचाईचा फटका बसला आहे त्यामुळे दिवाळी कशी साजरी होणार हे संकट घोंगावत आहे.
या घटनेनंतर ग्राम महसूल अधिकारी लहाने व कृषी सहायक स्वामी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून महसूल प्रशासनाला कळविण्यात आले आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाकडून शेतकऱ्यांना मदत होईल काय याची अपेक्षा केली जात आहे
Comments are closed.