मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी मिळाले 25 लाख, निलेश राणेंचा रवींद्र चव्हाणांवर गंभीर आरोप
Nilesh Rane on Ravindra Chavan BJP : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) ज्या ज्या वेळी जिह्यात येतात, तेव्हा वेगळं वातावरण करतात. मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी 25 लाख रुपये मिळाल्यावरुन शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केला आहे. काल रवींद्र चव्हाण मालवणमध्ये आले ते सहज आले नव्हते, त्यांच्यावर माझा संशय होता. मालवणमध्ये 6 ते 7 घर आहेत तिथे रोज पैशांच्या बॅग येतात. भाजपचे कार्यकर्ते तिथून येऊन घेऊन जातात. पैसे वाटून निवडून आल्यानंतर ते नगरसेवक काम करणार का? ते वसुलीच्या कामाला लागतील अशी टीका निलेश राणे यांनी केलीय.
बाहेरुन आलेल्या लोकांनी ही संस्कृती आणली
बाहेरुन आलेल्या लोकांनी ही संस्कृती आणली आहे, असा आरोप देखील निलेश राणे रवींद्र चव्हाण यांच्यावर केला. रवींद्र चव्हाण येतात, गडबड करतात, त्यांना जिरवा जिरवी करायची असते. रवींद्र चव्हाण यांनी विकासाचा अजेंडा कुठे दाखवला. आता 24 तास यांच्यावर लक्ष ठेवावं लागणार आहे. आम्ही पकडलं तर जागच्या जागी बंदोबस्त करु असेही निलेश राणे म्हणाले. पैसे वाटून नगरसेवक झाले तर ते भ्रष्टाचार करणार. त्यातून ते घर चालवणार, कसला विकास करणार? असा सवाल देखील निलेश राणे यांनी केलाय.
एक माणूस चुकला म्हणजे पुर्ण भाजप चुकलेली नाही. आम्ही भाजपावर आरोप करत नाही
युती करताना आमची गरज नव्हती. मात्र, मत मागायला आमच्या नेत्यांची गरज लागते. केसरकर, नारायण राणे या ज्येष्ठ नेत्यांची यांना गरज लागते. विरोधक दिशाभूल करून लोकांना फसवतील तर शहर तिथल्या तिथे अडकून पडतील असे म्हणत निलेश राणे यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजप आणि शिवसेना एकच कुटुंब आहे. आम्ही भाजपला वेगळ समजत नाही. एक माणूस चुकला म्हणजे पुर्ण भाजप चुकलेली नाही. आम्ही भाजपावर आरोप करत नाही असेही निलेश राणे म्हणाले.
एवढ्या वयात देखील दीपक केसरकर प्रचार करत आहेत
विरोधकांनी दीपक केसरकर आजारी असल्यामुळे त्यांचा आम्हाला समर्थन असल्याचं बोलून फायदा उठवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावर बोलताना निलेश राणेंनी समोरच्यांना लाज वाटली पाहिजे. एवढ्या वयात देखील दीपक केसरकर प्रचार करत आहेत, अजून काय केलं पाहिजे. त्यांच्या वयाचा मान राखा. बोलायचं असेल तर घरात बोला, समाजात बोललात तर देव माफ करणार नाही. ज्यांचे आशीर्वाद घ्यायचे त्यांच्यावर तुम्ही टीका करता. आशीर्वाद घेऊन लोकांच्या मनात तुमची उंची वाढली असती. तेवढं मोठ मन तुमचं नाही हे आम्हाला माहिती आहे, असे म्हणत निलेश राणे यांनी लहान भावाला सल्ला दिला.
नेमकं प्रकरण काय?
मालवणमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या घरी 25 लाख रुपयांची रोकड सापडली आहे. विजय किंजवडेकर असं त्यांच नाव आहे. त्यांच्या घरी हे पैसे काय करतात, हे सगळं निवडणूक यंत्रणेला सांगावे लागेल असे निलेश राणे म्हणाले. काल रवींद्र चव्हाण मालवण मध्ये येऊन गेले, कालपासूनच वेगाने पैसे वाटपाची पद्धत सुरू झाली आहे असे म्हणत राणे यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केले. पैसे वाटप करुन निवडणूक लढवायची पद्धत आहे का?. मैदानात येऊन लढा. त्या घरात अजून पैशाच्या बॅग आहेत. त्या शोधून योग्य ती कारवाई करावी. 25 ते 50 लाख रुपये भरून ठेवलेली मालवण मध्ये 8 ते 10 घर असल्याचा निलेश राणेंनी आरोप केला आहे.
भाजप जिंकली तर नगरपरिषदेत लुटायला जाणार
वातावरण गढूळ करून शहराचा असा प्रकारे विकास करणार का?. उद्या निवडणूक आयोगाकडे आणि पोलिस कार्यालयात जाऊन काय कारवाई केली याचा आढावा घेणार. भाजपचे कार्यकर्ते कोण कोण पैसे वाटप करतात, याची यादी देणार. पप्पा तवटे, रुपेश कानडे, रणजीत देसाई, मोहन सावंत अंगावर पैसे घेऊन वाटत आहेत. रोज यांच्याकडे बॅग पोहोचवण्याची यंत्रणा तयार असल्याचा दावा देखील निलेश राणेंनी केला. भाजप जिंकली तर लोकांची सेवा करायला नगरपरिषदेत जाणार नाहीत, नगरपरिषदेत लुटायला जाणार. आज रात्रीपासून जशी पोलिस यंत्रणा असेल तशी माझी यंत्रणाही असेल, रात्रभर सार्चिंग करणार. मालवणमध्ये कोण धुडगुस घालत ते बघायचं आहे. मी तयारीने आलेलो, हे लोक पैसे लपवण्याचा प्रयत्न करत होते. पळायचे सर्व मार्ग बंद केले, त्यामुळे ते घरात गप्प बसले. विजय किंजवडेकर यांना सुटणार आहेत हे माहिती आहे, त्यामुळे त्यांना घमेंड आहे. ही पैशांची घमेंड उतरायला वेळ लागणार नाही.
विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली, नेमकं काय म्हणाले रविंद्र चव्हाण?
दरम्यान, शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या आरोपांवर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या निवडणुकीत गेले 5 ते 6 दिवस झाले विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. कालच मी मालवणमध्ये जावून आलो आहे. तिथे आमचे नेते नारायण राणे, नितेश राणे यांच्या नेतृत्वाखालील केलेले काम योग्य आहे. त्याठिकाणी मतदान भरभरून होणार आहे. सुरुवात कुठून झाली तर भाजपाने युती का केली नाही म्हणून, कोणत्याही कार्यकर्त्याला व्यावसायिक म्हणून काम करण्याचा अधिकार नाही का? असा सवाल रविंद्र चव्हाण यांनी केला. फक्त नेत्यांनाच व्यवसाय करण्याचा अधिकार आहे का? ज्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला निवडून आणलं, त्या कार्यकर्त्यांच्या घरी अशा पद्धतीने काम करणे हे चांगले नाही, असा टोला मालवण पैसे पकडले प्रकरणात भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी निलेश राणे यांना लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
Nitesh Rane vs Nilesh Rane Kankavali Nagarparishad Election 2025: आपलेच आहेत तर समोर का?, निलेश राणेंचा सवाल; कोकणात नारायण राणेंची दोन्ही मुलं आमनेसामने, नेमकं काय घडलं?
आणखी वाचा
Comments are closed.