अमेरिकेतील पेनसिल्व्हेनियामध्ये अंदाधुंद गोळीबार, दोन मुलांसह 9 जणांचा मृत्यू; घरात लपलेला हल्लेखोरही ठार
अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया राज्यातील एरी शहरात शुक्रवारी संध्याकाळी गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात दोन लहान मुलांसह 9 जणांचा मत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर घरात लपलेला हल्लेखोरही ठार झाला आहे. एका घरात हा गोळीबार झाला. घराबाहेर दोन महिलांचे मृतदेह आढळले तर घराच्या आतमध्ये अन्य 7 मृतदेह आढळले.
न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास, एरीमधील पेरी स्ट्रीटच्या 700 ब्लॉकमध्ये गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले.
संशयित हल्लेखोर ज्या घरात लपला होता, त्या घराला पोलिसांनी घेराव घालत आरोपीला शरण येण्याचे आवाहन केले. दरम्यान, पुन्हा गोळीबाराचा आवाज आला. पोलिसांनी घरात प्रवेश केला असता आत आणखी मृतदेह आढळले. पोलिसांना घरात संशयित हल्लेखोराचा मृतदेहही आढळला. पोलीस सध्या गोळीबाराच्या कारणाबाबत तपास करत आहेत.
Comments are closed.