मणिपूरमध्ये नऊ दहशतवाद्यांनी अटक केली
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी तीन जिह्यांमधून अनेक बंदी घातलेल्या संघटनांशी संबंधित नऊ दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दहशतवाद्यांकडून देशी बनावटीच्या पिस्तूल आणि हातबॉम्बसह दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. थौबल जिल्ह्यातून कांगलेईपाक कम्युनिस्ट पार्टीच्या (केसीपी) चार सदस्यांना आणि थौबल जिल्ह्यातून युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंटच्या तीन सदस्यांना अटक करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी पोलिसांकडून देण्यात आली. तसेच इंफाळ पूर्व जिल्ह्यातून कांगलेईपाक कम्युनिस्ट पार्टीच्या एका सदस्याला अटक करण्यात आली. त्याव्यतिरिक्त विष्णुपूर येथून केसीपीच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली.
Comments are closed.