मधुबनी साडी.. सोनेरी बॉर्डर…अर्थसंकल्पाच्या दिवशी निर्मला सीतारमण यांच्या साडीचा ‘नादच खुळा!’
निर्मला सिथारामन साडी: आज 1 फेब्रुवारी.. भारताच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस, कारण आजच्याच दिवशी देशाचा अर्थसंकल्प सादर होत आहे. निर्मला यांच्या बजेट टॅबमधून यावेळी कोणाला काय मिळणार, हा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीचा अवघ्या देशभरात औत्सुक्याचं वातावरण आहे. हा अर्थसंकल्प मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग 8व्यांदा अर्थसंकल्पीय भाषण करणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्पाची कागदपत्रे घेऊन संसद भवनात पोहोचल्या असून त्यांच्या साडीचीही जोरदार चर्चा आहे. यंदा निर्मला सीतारमण यांनी खास साडी नेसली आहे, ज्यामध्ये काही खास कलाकृतीही दिसत आहेत. याआधीही अर्थसंकल्पादरम्यान अर्थमंत्र्यांनी वेगवेगळ्या पारंपरिक साड्या परिधान करून अर्थसंकल्प सादर केला आहे. जाणून घेऊया त्याची खासियत…
पांढरी साडी.. सोनेरी बॉर्डर…यंदाही निर्मला सीतारमण यांची साडी खास!
आजच्या अर्थसंकल्पासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी खास साडी नेसली आहे. यावेळी त्यांनी गोल्डन बॉर्डर (सोनेरी जरीची) असलेली क्रीम म्हणजेच फिकट पांढऱ्या रंगाची मधुबनी साडी नेसली आहे, माहितीनुसार, ही साडी त्यांना बिहारमध्ये राहणाऱ्या दुलारी देवी यांनी दिली होती. दुलारी देवी यांना 2021 चा पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.
बिहारमधील मधुबनी कलेने समृद्धी ‘अशी’ साडी
2021 मध्ये पद्मश्रीने सन्मानित दुलारी देवी यांनी मिथिला आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये एका कार्यक्रमादरम्यान अर्थमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीदरम्यान, त्यांनी बिहारमधील मधुबनी कलेच्या समृद्ध परंपरेबद्दल संभाषण केले होते. त्यावेळी दुलारी देवी यांनी सीतारमण यांना ही खास साडी भेट दिली आणि अर्थसंकल्पाच्या दिवशी ती परिधान करण्याची विनंती केली होती.
गेल्या 5 अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांच्या खास साड्या…
- 2024-25 च्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी आंध्र प्रदेशची मंगलगिरी साडी नेसली होती. राज्यातील गुंटूर जिल्ह्यातील ही साडी आहे.
- 2024 च्या अंतरिम बजेटमध्ये निर्मला सीतारामन यांनी पश्चिम बंगालच्या निळ्या कांथापासून विणलेली साडी नेसली होती.
- 2023 च्या अर्थसंकल्पाच्या दिवशी अर्थमंत्र्यांनी लाल पेशम आणि सोन्याच्या बॉर्डरची साडी परिधान केली होती.
- 2022 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी ओडिशाची बोमकाई साडी नेसली होती.
- 2021 च्या अर्थसंकल्पात पोचमल्ली इक्कत ही पारंपारिक तेलंगणाची साडी परिधान करण्यात आली होती.
मध्यमवर्गीयांमध्ये प्रचंड उत्सुकता
सकाळी 8.50 च्या सुमारास निर्मला अर्थ मंत्रालयात पोहोचल्या. त्यांच्या आधी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरीही मंत्रालयात पोहोचले होते. या अर्थसंकल्पाबाबत मध्यमवर्गीयांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. यावेळी मोदी सरकार मध्यमवर्गाला काहीतरी चांगलं मिळेल, असा विश्वास आहे. संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकेत दिले होते की यंदा गरीब, मध्यमवर्ग आणि महिलांसाठी अनेक नवीन उपक्रमांची घोषणा केली जाऊ शकते. आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील हे पहिले पूर्ण अर्थसंकल्प असल्याचे वर्णन करताना पंतप्रधान म्हणाले की, देशातील प्रत्येक गरीब आणि मध्यमवर्गीय समुदायावर लक्ष्मी देवीची विशेष आशीर्वाद राहो, अशी प्रार्थना त्यांनी केली.
अधिक पाहा..
Comments are closed.