निर्मिती सावंत यांचा ‘भागुबाई’ ओटीटीवर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अभिनेत्री निर्मिती सावंत यांचा ‘भागुबाई’ हा मराठी चित्रपट ओटीटीवर आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता घरबसल्या हलकीफुलकी, मनाला स्पर्श करणारी कलाकृती पाहता येईल. गावातील गप्पा, नात्यांमधला गोडवा आणि त्यातून मिळणारे आयुष्याचे धडे यांची मनोरंजक सांगड म्हणजे  ‘भागुबाई’  चित्रपट. याचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर जून 2026 मध्ये ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.

‘निर्मिती सावंत’ने साकारलेली भागुबाई ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करून जाते. त्यांच्यासोबत शशांक शेंडे, मंगेश देसाई, विजय पाटकर आणि भार्गवी चिरमुले यांनीही प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन संजय अमर यांनी केले आहे.

Comments are closed.