ऐन दिवाळीत राजभवनात मोठी घडामोड! निशिकांत देशपांडे बनले राज्यपालांचे नवे प्रबंधक; अप्पर जिल्हाध
निशिकांत देशपांडे: दिवाळीच्या कालावधीतच राजभवनातून एक मोठी घडामोड समोर येत आहे. राजभवनात (Raj Bhavan) राज्यपालांचे प्रबंधक म्हणून निशिकांत देशपांडे (Nishikant Deshpane) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देशपांडे यांना अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) म्हणून पदोन्नती देण्यात आली असून, त्यांनी राज्य शासनातील अनेक महत्त्वाच्या विभागांमध्ये यशस्वीपणे काम पाहिले आहे.
Nishikant Deshpande: निशिकांत देशपांडे बनले राज्यपालांचे नवे प्रबंधक
निशिकांत देशपांडे यांनी यापूर्वी जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, पर्यटन आणि क्रीडा अशा विविध महत्त्वाच्या खात्यांमध्ये मंत्र्यांचे खाजगी सचिव म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या प्रशासकीय अनुभव आणि कार्यक्षमतेची दखल घेत त्यांची ही महत्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपालांचे प्रबंधक म्हणून ते आता राजभवनाच्या प्रशासनात प्रमुख भूमिका बजावणार आहेत.
Sanjay Shirsat: सामाजिक न्याय मंत्र्यांची दिवाळी भेट
दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी महायुतीतील प्रथमच निवडून आलेल्या आमदारांना मोठी भेट दिली आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत प्रत्येकी 2 कोटी रुपयांचा विकासनिधी मंजूर करून वितरित केला आहे. ही योजना दलित वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधांसह विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देणारी एक महत्त्वाची योजना आहे. राज्यात ती लोकप्रिय असून, विविध लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघांमध्ये सामाजिक विकासासाठी निधी देण्यात येतो.
Sanjay Shirsat: महायुतीच्या आमदारांना प्रत्येकी 2 कोटींचा निधी
गेल्या काही महिन्यांपासून निधीसाठी आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला होता. उपलब्ध निधी आणि मागणीत समतोल राखत, मंत्री शिरसाट यांनी फक्त प्रथमच निवडून आलेल्या महायुतीच्या आमदारांनाच 2 कोटींचा निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला. दिवाळीपूर्वीच हा निधी वितरित झाल्यामुळे संबंधित आमदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या निर्णयामुळे दलित वस्त्यांतील विविध विकासकामांना गती मिळणार असल्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, पाहा Video
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.