Nitesh Rane responded by criticizing Aditya Thackeray after Uddhav Thackeray said he was as tall as a penguin.


उद्धव ठाकरे यांनी षण्मुखानंद सभागृहात गुरुवारी (19 जून) पार पडलेल्या वर्धापन दिन मेळाव्यात बोलताना नितेश राणेंची इज्जतची काढली. उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना नितेश राणे यांनी स्वत:च्या मुलाकडे म्हणजे आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहण्याचा सल्ला दिला आहे.

मुंबई : भाजपा आमदार आणि मंत्री नितेश राणे हे नेहमीच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटावर टीका करताना दिसतात. तसेच नितेश राणे हे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवरही टीका करतात. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी षण्मुखानंद सभागृहात गुरुवारी (19 जून) पार पडलेल्या वर्धापन दिन मेळाव्यात बोलताना नितेश राणेंची इज्जतची काढली. उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना नितेश राणे यांनी स्वत:च्या मुलाकडे म्हणजे आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहण्याचा सल्ला दिला आहे. (Nitesh Rane responded by criticizing Aditya Thackeray after Uddhav Thackeray said he was as tall as a penguin)

उद्धव ठाकरेंच्या टीकेसंदर्भात प्रश्न विचारल्यावर नितेश राणे म्हणाले की, काही जणांना आम्ही जिहादी हृदयसम्राट म्हणतो. त्यामुळे हिंदू धर्मासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शिव्या शापच मिळणार. खरं तर बाळासाहेबांच्या मुलाला हिंदुत्वाचं काम करणारे लोक खटकणारच. त्यांनी (उद्धव ठाकरे) बाळासाहेबांचे विचार सोडले, म्हणून त्यांना बोलतो. त्यांनी विचार सोडले म्हणून त्यांना आता ठाकरे ब्रँडची चिंता आहे. परंतु स्वतःचा मुलगा कसा आहे, हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी मला पेंग्विन म्हटल्याने मला काही फरक पडत नाही. त्यांनी पहिल्यांदा स्वतःच्या मुलाची अवस्था बघावी, अशी घणाघाती टीका राणे यांनी केली.

हेही वाचा – MNS VS Thackeray : …तर ठाकरे गट सकारात्मक असता का? विधानसभेचा उल्लेख करत मनसे नेत्याचा सवाल

नितेश राणे म्हणाले की, दिनो मोरिया आणि दिशा सालियानबद्दल आम्ही माहिती देत आहोत, त्यामुळे आमच्यावर त्यांच्याकडून टीका केली जाते. परंतु त्यांनी जर स्वतःच्या मुलाचं नाईट लाइफ कमी केलं असत, तर या गोष्टी टाळता आल्या असत्या. तसेच आदित्य ठाकरे यांचा आवाज न बाईचा न माणसाचा. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा बाप सिल्वर ओक की जन पथला हेच त्यांना माहीत नाही. वरळी सांभाळता आली नाही आणि आता आमदारकीला काठावर पास झालेला विद्यार्थी मुंबई लढवणार का? आदित्य ठाकरेला निवडणुकीसाठी तुम्ही अधिकृत जाहीर करा, मग आम्ही महापौर जाहीर करतो, असे आवाहनही राणे यांनी केले.

उद्धव ठाकरेंची बौद्धिक पातळी कळते 

उद्धव ठाकरेंवर टीका करताना नितेश राणे म्हणाले की, महाविकास आघाडीची सत्ता असताना स्वतःच्या बापाचं नाव लावायची त्यांना लाज वाटायची. राहुल गांधी स्टेजवर असताना हिंदूहृदयसम्राट बोलण्याची तरी त्यांनी हिंमत करायला हवी होती. पण त्यांच्यात हिंमत नाही, त्यामुळे उबाठा वर्धापन दिन इस्लामाबादमध्ये साजरा झाला पाहिजे होता. खरं तर उद्धव ठाकरे राजकीय लव्ह जिहाद झाल्याचे उदाहरण आहेत. हम दो हमारे दो एवढंच त्यांनी केलं. त्यामुळे माझ्यावरील टीकेवरून उद्धव ठाकरेंची बौद्धिक पातळी कळते. कारण राज्याच्या हितासाठी ते कधीही भांडले नाहीत. त्यांच्यात कौटुंबिक भांडणं होती. आता एकाकडे शून्य आमदार आणि एकाकडे 20 आमदार असल्यावर काय होणार? असे म्हणत नितेश राणे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवरही भाष्य केलं.

हेही वाचा – Politics : अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी सर्व उदाहरणे; गोगावले प्रकरणी अंनिसचा फडणवीस-शिंदेवरही निशाणा



Source link

Comments are closed.