Nitesh Rane strongly criticizes Sanjay Raut for calling him a scoundrel
खासदार संजय राऊत यांनी पहलगाम येथील हल्ल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. संजय राऊत यांच्या या मागणीवर भाजपाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. मंत्री नितेश राणे यांनीही संजय राऊतांवर टीका केली आहे.
मुंबई : पहलगाम येथे (22 एप्रिल) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांसह 26 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याचा निषेध करत भारताने पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राइक केलं आहे. मात्र त्यानंतरही विरोधक केंद्र सरकारवर टीका करताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पहलगाम येथील हल्ल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. संजय राऊत यांच्या या मागणीवर भाजपाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. मंत्री नितेश राणे यांनीही संजय राऊतांवर टीका केली आहे. (Nitesh Rane strongly criticizes Sanjay Raut for calling him a scoundrel)
संजय राऊत यांनी अमित शहांचा राजीनामा मागितला आहे, यासंदर्भात नितेश राणेंना प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, शेंबड्या लोकांना तुम्ही देशाचे प्रश्न काय विचारता? भांडुपच्या देवानंदला देशपातळीचे प्रश्न, आंतरराष्ट्रीय पातळीचे प्रश्न विचारल्यावर अशीच उत्तर तुम्हाला मिळणार. त्याचा मालक (उद्धव ठाकरे) ज्यावेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता, त्यावेळी महाराष्ट्र कोरोना काळात नंबर एकला होता. त्यावेळी, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला होता का? संजय राऊत आता कुठल्या तोंडाने अमित शहा यांचा राजीनामा मागत आहेत? असा प्रश्न नितेश राणे यांनी विचारला आहे.
हेही वाचा – Sanjay Gaikwad : आतंकवाद्यांचे मेसेज समजण्यासाठी…; संजय गायकवाड यांच्या वक्तव्याने राजकारण तापणार
काय म्हणाले होते संजय राऊत?
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटवले. त्यानंतर सरकारचे नियंत्रण राहावे म्हणून जम्मू-कश्मीर केंद्रशासित केले. त्यामुळे आता पहलगाममधील हल्ल्याची सर्वस्वी जबाबदारी मोदी सरकारची आहे. नेहमी द्वेषाच्या राजकारणात गुंतलेले आणि सरकारे पाडण्यासाठी कटकारस्थाने करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे देशाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झाले आहे. ते देशाची सुरक्षा करण्यात अपयशी ठरलेले आहे. त्यामुळे अमित शहा यांनी तातडीने राजीनामा द्यावा, एक मिनिटही ते गृहमंत्री पदावर राहण्यास योग्य नाहीत, असे संजय राऊत म्हणाले होते.
Comments are closed.