राणे विरुद्ध राणे…कोकणात दोन्ही भावांचा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार; दोघंही म्हणाले, आपलीच स


Nitesh Rane vs Nilesh Rane Politics News सिंधुदुर्ग: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे (Maharashtra Local Body Elections) पडघम आतापासूनच तळकोकणात वाजू लागले आहेत. त्यात आता भाजप (BJP) आणि शिंदे शिवसेनेची (Shivsena Shinde Group) युती होत नसल्यामुळे दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार आहेत. यामुळे सिंधुदुर्गात नितेश राणे विरुद्ध निलेश राणे (Nitesh Rane vs Nilesh Rane) असा दोन्ही भावांचा राजकीय संघर्ष पहायला मिळणार आहे. दोघेही भाऊ आपलीच सत्ता येईल असं वक्तव्य करत असल्याने आगामी काळात राणे विरुद्ध राणे असा राजकीय संघर्ष सिंधुदुर्गात पाहायला मिळणार आहे.

शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांनी जिल्हा परिषद 100 टक्के शिवसेना काढणार म्हणजे काढणारच असं वक्तव्य कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केलं. 27 वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद नारायण राणे यांनी टिकवली, दर्जा मिळवून दिला. तोच दर्जा शिवसेनेच्या माध्यमातून टिकवून ठेवू. नारायण राणेंनी मला आशीर्वाद दिलाय, जा तू शिवसेना वाढव, तू या शिवसेनेचा आहे, तिथे शिवसेनाच वाढली पाहिजे. त्यामुळे आम्ही मैदानात उतरलो आहोत, असं निलेश राणे (Nilesh Rane) म्हणाले.

येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती शिवसेना 100 टक्के जिंकणार- निलेश राणे (Nilesh Rane vs Nitesh Rane)

कोणीतरी येऊन काहीतरी आश्वासन देईल, त्यांच्या बोलण्यामध्ये येऊ नका. मी केव्हाही आतापर्यंत जिल्हा परिषदेची पायरी चढून गेलो नाही, मात्र जनतेची काम केली. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती शिवसेना 100 टक्के जिंकणार, असं निलेश राणेंनी सांगितले. मंत्रालयात कुडाळ मालवण मतदारसंघाचे चित्र मी बदलून टाकलं. कधी नव्हे ते तिन्ही राणे सभागृहात आहेत. नारायण राणे खासदार आहेत, तर आम्ही दोन्ही भाऊ आमदार आहोत. कुठल्याही जिल्हा असं चित्र नाही, एकाच कुटुंबातील तिघे राजकारणामध्ये लोकांमधून निवडून आलो आहोत, असं निलेश राणे म्हणाले.

दोन्ही पक्षांची स्वबळाची तयारी- नितेश राणे (Sindhudurg Politics News)

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मध्ये जिल्ह्यात स्वबळावर किंवा मैत्रीपूर्ण लढविल्या जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे. स्वबळावर निवडणुका लढविण्यासाठी राजकीय पक्ष त्या मूडमध्ये गेले आहेत. आम्ही प्रत्येकजण स्वबळावर निवडणुका लढण्याचा तयारीला लागलेले आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोन्ही पक्षांची तुल्यबळ ताकद आहे. शिवसेना भाजप मध्ये युती करून आम्ही बंडखोरीला का प्रोत्साहन देऊ उबाठाकडे निवडणुका लढविण्यासाठी उमेदवारच नाहीत, असं नितेश राणेंनी सांगितले. महाविकास आघाडीची उमेदवार उभे करण्याची क्षमता नाही. वेगवेगळे लढून निवडणुकीनंतर एकत्र सत्ता स्थापन करू…दोन्ही पक्षांची स्वबळाची तयारी असून 50-50 उमेदवार तयार आहेत, असं मंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणे म्हणाले.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

संबंधित बातमी:

Nitesh Rane: कोकणात भाजपचा शिंदेंना दे धक्का; मंत्री नितेश राणे म्हणाले, सिंधुदुर्गात स्वबळावर लढणार

आणखी वाचा

Comments are closed.