शेतकऱ्यांना देशोधडीला लावलेय! – नितीन बानगुडे-पाटील
शेतकरी आत्महत्येचा गंभीर प्रश्न, बंद पडत चाललेल्या मराठी शाळा आदी मुद्दय़ांवरून शिवसेना उपनेते नितीन बानगुडे-पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला. भाजप सरकार फक्त घोषणाबाजी करण्यात मशगूल आहे. सरकारच्या अपयशामुळेच राज्यात 1987 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावलेय, असा आरोप त्यांनी केला.
तुम्हाला प्रश्न विचारणारच. हा हक्क आहे. ते स्मार्ट इंडियाचे काय झाले? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी काय केले? अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काय झाले? असे प्रश्न नक्कीच विचारले जातील. 90 हजार शाळा बंद झाल्या. त्यामुळे शक्तिपीठाच्या गोष्टी बाजूला ठेवून ज्ञानपीठाचा मार्ग बनवण्याकडे लक्ष द्यावे. सध्याच्या घडीला दानपेटीत टाकलेले दान आणि मतपेटीत टाकलेले मत कुठे गेले हेच कळत नाही, असे नमूद करतानाच बानगुडे-पाटील यांनी महिला सुरक्षेतील सरकारच्या अपयशावरही जोरदार टीका केली.
Comments are closed.