नितीन गडकरी म्हणाले, बायको चांगली नसेल तर माणूस यशस्वी होऊ शकत नाही
बायको जर चांगली नसेल तर नवरा कितीही कर्तृत्ववान असो, तो राजकारणात, समाजकारणात आणि व्यवसायात यशस्वी होऊ शकत नाही, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. माजी आमदार अनिल सोले यांच्या 67व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी एखादी व्यक्ती कितीही कर्तृत्ववान असली तरी तिच्या यशामागे कुटुंबाची आणि विशेषतः पत्नीची भूमिका महत्त्वाची असते, अशी भूमिका मांडली. सामाजिक व राजकीय जीवन जगताना केवळ संबंधित व्यक्तीलाच नव्हे, तर त्याच्या कुटुंबीयांनाही अनेक अडचणी आणि त्रास सहन करावा लागतो, असेही गडकरी यांनी सांगितले.
Comments are closed.