…तर देशात इलेक्ट्रिक वाहनांचे प्रमाण वाढेल; नितीन गडकरींकडून अर्थसंकल्पाची स्तुती, म्हणाले…

युनियन बजेट 2025 वर नितीन गडकरी: देशाच्या इतिहासातला अत्यंत महत्त्वाचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन(Nirmala Sitaraman) यांनी सादर केला आहे. हे बजेट अर्थव्यवस्थेला चालना देणारा बजेट (Union Budget 2025) आहे. केंद्र सरकार पायाभूत सुविधाना नेहमीच प्राधान्य देत होतं. त्या संदर्भातील तरतुदी यंदा वाढवल्या आहे, त्यामुळे रस्ते निर्मितीच्या क्षेत्रात त्याचा मोठा फायदा होईल. तसेच शेती क्षेत्र आणि शेतकरी आत्मनिर्भर करण्यावर विशेष भर दिला असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)  यांनी दिली आहे.

…तर देशात इलेक्ट्रिक वाहनांचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढेल –  नितीन गडकरी

भारत 22 लाख कोटींचे इंधन आयात करतो. लिथियम आयन बॅटरी स्वस्त करण्यात आल्यामुळे इलेक्ट्रिक व्हेईकल स्वस्त होतील. जे 150 डॉलर प्रति किलोवॅट प्रती तास होते, ते भविष्यातील 100 डॉलर प्रति किलोवॅट प्रति तासच्या खाली जाईल आणि त्यामुळे इलेक्ट्रिक व्हेईकल्स स्वस्त होतील. किंबहुना त्यामुळे प्रदूषणही कमी होईल. असा विश्वासही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला आहे. आयकर संदर्भात नवीन नियम आणून सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. मध्यम वर्गाचा विचार करून बारा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त केले आहे. असेही  नितीन गडकरी म्हणाले.

दरम्यान, लिथियम-आयन बॅटरी, ईव्ही बॅटरी उत्पादनासाठी 35 अतिरिक्त भांडवली वस्तू आणि मोबाईल फोन बॅटरी उत्पादनासाठी 28 वस्तूंना मूलभूत सीमाशुल्कातून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात  इलेक्ट्रिक व्हेईकला चांगले दिवस येण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

अर्थसंकल्पाचे विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन कडून जोरदार स्वागत

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प गेल्या दशक भरातला सर्वोत्तम अर्थसंकल्प असल्याची पावती नागपुरातील चार्टर्ड अकाउंटंट्सनी दिली आहे. आज सादर झालेला अर्थसंकल्प शुद्ध स्वरूपात विकासाला गती देणारा अर्थसंकल्प असून निवडणूक लक्षात घेऊन सादर केलेला अर्थसंकल्प नाही, असे मत चार्टर्ड अकाउंटंट सचिन जाजोदिया यांनी व्यक्त केले आहे.

आजचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून त्यामध्ये मध्यमवर्ग, नवीन स्टार्टअप सुरू करणारे तरुण, तसेच अनेक वर्षांपासून उद्योग चालवणारे अनुभवी उद्योजक सर्वांसाठी काही ना काही आहे. सर्वात महत्त्वाची बाब या अर्थसंकल्पात उद्योगासाठी काहीही नुकसानकारक तरतुदी नाहीत, अशी प्रतिक्रिया ही विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन दिली आहे. त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे विदर्भ इंडस्ट्री असोसिएशनकडून जोरदार स्वागत करण्यात आले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

Comments are closed.