टीम इंडियामधून बाहेर अन् आता थेट गुन्हा दाखल! पुरता फसला टीम इंडियाचा स्टार खेळाडू, नेमकं काय आ

नितीष कुमार रेड्डी न्यूज: भारतीय क्रिकेट संघातील युवा खेळाडू नितीश कुमार रेड्डी दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेतून बाहेर पडला. पण सध्या फक्त तो दुखापतीमुळे नाही, तर एका मोठ्या वादामुळेही चर्चेत आला आहे. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत त्याने दोन सामने खेळले, मात्र चौथ्या कसोटीपूर्वी दुखापतीमुळे तो मालिकेतून बाहेर पडला आणि भारतात परतला. परतताच त्याच्यावर तब्बल 5 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे.

नितीश कुमार रेड्डी अडचणीत

अहवालानुसार, बंगळुरूस्थित टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी ‘स्क्वायर द वन प्रायव्हेट लिमिटेड’ने दिल्ली उच्च न्यायालयात नितीश रेड्डीविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. या एजन्सीचा दावा आहे की नितीशने त्यांच्याशी 3 वर्षांसाठी करार केला होता, पण त्याने तो एकतर्फी तोडून नवीन एजन्सीसोबत करार केला आणि सुमारे 5 कोटी रुपयांची थकबाकी न भरता कराराचे उल्लंघन केले.

अजून एका वृत्तानुसार, नितीश कुमार रेड्डी याने स्वतः कोर्टात लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा दावा आहे की जुन्या एजन्सीने कोणतीही एंडोर्समेंट डील मिळवून दिली नाही, ती त्यांनी स्वतःच्या प्रयत्नातून मिळवली. त्यामुळे त्यांनी कोणतेही पैसे देण्यास नकार दिला आहे. सध्या त्यांनी यावर कोणताही अधिकृत खुलासा दिलेला नाही. त्याची सुनावणी सोमवार, 28 जुलै रोजी दिल्ली उच्च न्यायालयात होण्याची अपेक्षा आहे. क्रिकेटमधील करिअरच्या सुरुवातीला अशा प्रकारच्या वादात अडकणं नितीशसाठी नक्कीच धोक्याचं लक्षण ठरू शकतं.

22 वर्षीय नितीशने इंग्लंडविरुद्ध दुसरी (बर्मिंघम) आणि तिसरी (लॉर्ड्स) कसोटी खेळली. मात्र बर्मिंघममध्ये त्याची कामगिरी निराशाजनक राहिली. त्यानंतर लॉर्ड्समध्ये त्याने काही प्रमाणात चांगली कामगिरी केली होती. पण नंतरच्या सरावादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे त्याला मालिकेतून माघार घ्यावी लागली.

त्याची कसोटीतली कामगिरी अशी होती :

बर्मिंघम कासोती:

  • फलंदाजी : 2 धावा (1+1)
  • गोलंदाजी : 0/29

लॉर्ड्स कसोटी :

  • फलंदाजी : 43 धावा (30+13)
  • गोलंदाजी : 2/62 आणि 1/20

हे ही वाचा –

Koneru Humpy vs Divya Deshmukh : कोण बनणार बुद्धिबळाची राणी? कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुखचा पहिला गेम 41 चालींनंतर ड्रॉ, रविवारी होणार खऱ्या चॅम्पियनचा फैसला

Priyanka Chaturvedi : दहशतवाद्यांशी सामना कसा? आशिया कपच्या IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर प्रियंका चतुर्वेदींचा BCCI आणि मोदी सरकारवर घणाघात

आणखी वाचा

Comments are closed.