टीम इंडियाला धक्का; अष्टपैलू खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 टी-20 सामन्यांमधून बाहेर, पाहा भार
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, पहिला T20I अपडेट : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना बुधवारी, 29 ऑक्टोबर रोजी कॅनबेरा येथे खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करणार आहे. दरम्यान, बीसीसीआयने नितीश कुमार रेड्डीबाबत अपडेट दिली आहे.
🚨 नाणेफेक 🚨#TeamIndia कॅनबेरा येथे प्रथम फलंदाजी करण्यास सांगितले आहे.
अपडेट्स ▶️ https://t.co/VE4FvHCa1u
#AUSWIN | #1stT20I pic.twitter.com/tfUulkeLDZ
— BCCI (@BCCI) 29 ऑक्टोबर 2025
नितीशकुमार रेड्डी यांच्याबाबत बीसीसीआय ने दिली अपडेट
नितीश कुमार रेड्डीला पहिल्या तीन टी-20 सामन्यांतून वगळण्यात आले आहे. अॅडलेडमध्ये झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात डाव्या मांडीच्या स्नायूला झालेल्या दुखापतीतून तो सावरत होता. मात्र, त्याला आता नेक स्पॅझम्सची तक्रार जाणवली आहे, ज्यामुळे त्याच्या पुनर्वसन आणि हालचालींवर परिणाम झाला आहे. बीसीसीआयची वैद्यकीय टीम सध्या त्याच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवत आहे.
🚨 अपडेट
नितीश कुमार रेड्डी पहिल्या तीन T20 सामन्यांसाठी बाहेर पडला आहे. ॲडलेडमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान डाव्या क्वाड्रिसेप्सच्या दुखापतीतून सावरलेल्या या अष्टपैलू खेळाडूने मानेच्या दुखापतीची तक्रार केली, ज्यामुळे त्याच्या पुनर्प्राप्तीवर आणि गतिशीलतेवर परिणाम झाला. बीसीसीआय वैद्यकीय… pic.twitter.com/ecAt852hO6
— BCCI (@BCCI) 29 ऑक्टोबर 2025
कर्णधार सूर्यकुमार यादव काय म्हणाला?
पहिल्या टी-20 सामन्यासाठी संघ निवडीबाबत कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेकीदरम्यान सांगितले की, रिंकू सिंग, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग आणि नितीश कुमार रेड्डी या सामन्यात खेळत नाहीत. पण, त्याने नितीशच्या दुखापतीबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. या मालिकेसाठी 16 सदस्यीय संघ निवडण्यात आला होता, त्यापैकी 11 खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये आहेत आणि 5 खेळाडू बेंचवर बसतील. अर्शदीप सिंग सध्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे, परंतु तो देखील संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकला नाही.
भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (विकेटकी ऑन), टिळक वर्मा, संजू समसान (विकेटकी पार), शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया संघाची प्लेइंग इलेव्हन : मिशेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), टिम डेव्हिड, मिशेल ओवेन, मार्कस स्टोइनिस, जोश फिलिप, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, जोश हेझलवूड.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.