वैभवच्या पराक्रमाची दखल! बिहारच्या मुख्यमंत्र्यांकडून खास बक्षिसाची घोषणा

आयपीएल 2025 स्पर्धेतील 47 वा सामना काल म्हणजेच 28 एप्रिल रोजी राजस्थानच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल संघामध्ये खेळला गेला. या सामन्यात गुजरात विरुद्ध इतिहास घडवत शतकी खेळी करणारा 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीसाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दहा लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे. वैभव सूर्यवंशीने सवाई मानसिंग स्टेडियममध्ये त्याच्या शानदार खेळीने टी-20 इतिहासात एक मोठा विक्रम घडवला आहे. 14 वर्षीय वैभवने आत्ताच क्रिकेटच्या करिअरमध्ये पावले टाकली आहेत. त्याने गुजरातच्या गोलंदाजांना घाम फोडला.

14 वर्षे आणि 32 दिवसांच्या वयात बिहारमध्ये राहणारा वैभव टी20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा सर्वात कमी वयातील खेळाडू ठरला आहे. तसेच 2013 मध्ये पुणे वॉरियर्स विरुद्ध क्रिस गेल 30 चेंडूत कॅश-रीच लीगच्या इतिहासात दुसरे सर्वात वेगवान शतक झळकावणारा खेळाडू ठरला. सूर्यवंशीच्या जोरदार खेळीला रोखण्यासाठी प्रसिद्ध कृष्णाच्या यॉर्करची गरज पडली. नितीश यांनी राजस्थानला गुजरात विरुद्ध विजयासाठी शुभेच्छा दिल्या आणि मंगळवारी राज्य सरकारकडून दहा लाख रुपये वैभवला देण्याची घोषणा केली.

नितीश यांनी एक्सवर पोस्ट करत लिहिले आहे की, आयपीएलच्या इतिहासात शतक झळकावणारा सर्वात कमी वयातील बिहारचा खेळाडू वैभव सूर्यवंशीला शुभेच्छा आणि त्याचे अभिनंदन. त्याच्या मेहनतीने आणि कष्टाच्या जोरावर तो भारतीय क्रिकेटसाठी एक नवीन आशा ठरला आहे. सर्वांना त्याचा अभिमान आहे. मी 2024 मध्ये वैभव सूर्यवंशी आणि त्याच्या वडिलांना भेटलो होतो आणि त्यावेळी त्याच्या उज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली होती. आयपीएल मधील त्याच्या शानदार प्रदर्शनानंतर मी त्याला फोन करून शुभेच्छा दिल्या.

बिहारचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून 10 लाख रुपये पुरस्कार बक्षीस देण्यात येणार आहे. माझी प्रार्थना आहे की, वैभव भविष्यात भारतीय संघासाठी एक मोठे नाव ठरावे आणि भारताचे नाव उज्वल करावे. केंद्रीय मंत्री चिराग पासवानने सुद्धा 14 वर्षीय वैभवच्या शानदार खेळीसाठी त्याचे कौतुक केले आणि पत्रकारांशी म्हटले, आमच्या पार्टीकडून मी त्याला शुभेच्छा देतो. त्याने एवढ्या कमी वयामध्ये खूप चांगली सुरुवात केली आहे, त्याचे भविष्य उज्वल आहे.

Comments are closed.