कोणत्याही पक्षाशी युती नाही: विजय
तामिळनाडूत मुख्य लढत द्रमुक अन् टीव्हीके यांच्यातच
वृत्तसंस्था/ चेन्नई
अभिनयाच्या क्षेत्रातून राजकारणात पदार्पण केलेल्या विजय यांचा पक्ष तमिलगा वेत्री कझगम (टीव्हीके) पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उतरणार आहे. याचदरम्यान विजय यांनी जनतेला राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये उमेदवार निश्चित करण्यास मदत करण्याचे आवाहन केले आहे. चेन्नईतील एका सभेत विजय यांनी मदुराई पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली आहे. तामिळनाडू निवडणुकीकरता सत्तारुढ द्रमुक किंवा केंद्रातील सत्तारुढ भाजपसोबत आघाडी करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मदुराईच्या सर्व मतदारसंघांमध्ये मीच उमेदवार आहे असे समजून लोकांनी मतदान करावे. उमेदवार कुठलाही असो लोकांनी टीव्हीकेलाच मतदान करावे असे विजय यांनी सभेला संबोधित करताना म्हटले आहे.
राज्यात प्रस्थापित द्रविड पक्ष म्हणजेच अण्णाद्रमुक आणि द्रमुकच्या अधीन राहण्यात कुठलेच स्वारस्य नाही. मी एक सिंह आहे, मी स्वत:चे क्षेत्र ठरवत आहे. टीव्हीके एक अजेय शक्ती असून ती येथे प्रभुत्व निर्माण करण्यासाठी आहे. अण्णाद्रमुकसोबत आघाडी केल्याने भाजपबद्दलची माझी भूमिकाही बदलली असल्याचे वक्तव्य विजय यांनी केले आहे.
कुठलीच आघाडी नाही
तामिळनाडूत 2026 ची निवडणूक द्रमुक आणि टीव्हीके यांच्यातच होईल. माझा एकमेव वैचारिक शत्रू भाजप आहे आणि एकमेव राजकीय शत्रू द्रमुक आहे. टीव्हीकेचे राजकारण वास्तविक, भावनात्मक आणि लोकांच्या कल्याणासाठी आहे. आमची प्राथमिकता महिला, वृद्ध आणि मुलांची सुरक्षा आहे. शेतकरी, युवा, उपेक्षित वृद्ध आणि शारीरिक स्वरुपात अक्षम लोकांवर विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने पावले उचलावीत
कच्चातीवु परत मिळविणे आणि नीट रद्द करण्यासारख्या मुद्द्यांवर केंद्र सरकारने पावले उचलावीत. श्रीलंकेच्या नौदलाने तामिळनाडच्या 800 मच्छिमारांना हल्ले केले आहेत. आमच्या मच्छिमारांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कच्चातिवू बेट परत मिळविले जावे. तर नरेंद्र मोदी हे नीट ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा रद्द करू शकतात का असे प्रश्नार्थक विधान विजय यांनी सभेवेळी केले आहे.
मदुराईचीच निवड का
प्राचीन मदुराई शहराला तमिळ वारशाची राजधानी मानण्यात येते. हे तमिळ राजकारणाचे केंद्र आहे. अण्णाद्रमुकचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या शहरावर आता द्रमुकचा कब्जा आहे. स्वत:च्या पक्षाच्या दुसऱ्या राज्य संमेलनासाठी या शहराची निवड करत विजय यांनी स्वत:चा आत्मविश्वास दाखवून दिला आहे. दक्षिण तामिळनाडूसाठी एक राजकीय संदेश आणि द्रमुकविरोधी मतांना एकत्र करण्याचा प्रयत्न म्हणून याकडे पाहिले जातेय.
Comments are closed.