मोठी बातमी: चॅम्पियन्स ट्रॉफीची खुली बस परेड रद्द, खेळाडू स्वतंत्रपणे घरी जाणार!

यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीवर (ICC Champions Trophy 2025) रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आपले नाव कोरले. भारताने फायनलमध्ये मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडचा 4 गडी राखून धुव्वा उडवला. यानंतर आता एक मोठी बातमी समोर येत आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर विजेत्या भारतीय संघाच्या खुल्या बस परेडचे नियोजन सध्या तरी नसल्याची माहिती समोर येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

बीसीसीआयने बस परेडचे नियोजन रद्द केल्यामुळे भारतीय संघाचे खेळाडू स्वतंत्रपणे आपापल्या घरी परतणार आहेत. बीसीसीआयने बस परेड का रद्द केली, याचे कोणतेही अधिकृत कारण दिलेले नाही. पण काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खेळाडूंच्या सुरक्षेच्या कारणास्तव बस परेड रद्द करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

ICC चा नियम बदलला असता, तर आज रंगला असता 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना!
यजमान पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून भारतीय संघ ठरला चॅम्पियन! जाणून घ्या अविस्मरणीय क्षण
शमीच्या रोजाबाबत इंजमाम उल हकचं मोठं वक्तव्य! जाणून घ्या एका क्लिकवर

Comments are closed.