बेकायदा होर्डिंग नकोच; राजकीय बॅनर, पोस्टरबाबत आदित्य ठाकरे यांच्या सूचनेचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
महाराष्ट्रातील शहरात राजकीय बॅनर, होर्डिंगवर बंदी घालण्याची आदित्य ठाकरे यांनी मागणी केली आहे ही चांगली गोष्ट आहे. राज्यात बेकायदा हेर्डिंग लागणार नाहीत याची काळजी आम्ही घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
राजकीय बॅनर, पोस्टर हेर्डिंगवर बंदी घालण्याचे आवाहन शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केले आहे. यासंदर्भात माध्यम प्रतिनिधींनी पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आदित्य ठाकरे यांची सूचना चांगली आहे. कारण उच्च न्यायालयानेही यासंदर्भात सूचना केल्या आहेत. महाष्ट्रात आपण चांगल्या प्रकारे पाळतो. तरीदेखील अनेकदा कार्यकर्ते उत्साहाच्या भरात बेकायदा हेर्डिंग लावतात. आमच्या काळातही कार्यकर्त्यांनी लावले पण मी ते काढायला लावले. पण मला असे वाटते की, हेर्डिंगच्या संदर्भात उच्च न्यालयाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याची आम्ही काळजी घेऊ असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.
Comments are closed.