अनिल अंबानींवर खालच्या पातळीवर टीका नको! हायकोर्टाची रिपब्लिक टीव्हीला तंबी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ब्रेकिंग न्यूज आणि सनसनाटीच्या नावाखाली बेजबाबदारपणे वृत्तांकन करणाऱया अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीला मुंबई उच्च न्यायालयाने आज खडसावले. बातमी प्रसिद्ध करण्याचा अधिकार असला तरी ती देताना भाषेचा आणि तथ्यांचा दर्जा राखला गेला पाहिजे. एखाद्याची वैयक्तिक बदनामी होईल यासाठी खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नये, अशा शब्दांत कानउघाडणी करत न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी रिपब्लिक टीव्हीवर मर्यादा घातली.

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि इतर पंपन्यांशी संबंधित सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीबाबत रिपब्लिक टीव्ही ज्या पद्धतीने बातम्या प्रसारित करत आहे त्यामुळे आपली व आपल्या पंपनीची प्रतिमा मलिन होत असल्याचा दावा करत अंबानी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. प्रतिमा मलिन करणाऱया बातम्यांवर तात्पुरती बंदी घालावी, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली. या याचिकेवर आज बुधवारी न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी न्यायालयाने रिपब्लिक टीव्हीवर ताशेरे ओढले.

अनिल अंबानींचा युक्तिवाद

अंबानी यांच्या वतीने अॅड. मयूर खंडेपारकर यांनी बाजू मांडली त्यांनी असा दावा केला होता की, संबंधित पंपन्यांच्या व्यवस्थापनात अनिल अंबानी यांचा थेट सहभाग नसतानाही रिपब्लिक चॅनेल त्यांना वैयक्तिकरित्या लक्ष्य करत आहे, ज्यामुळे अनिल अंबानी यांच्या प्रतिष्ठsला धक्का पोहोचत आहे. इतकेच नव्हे तर हे अखंडपणे सुरू असून एखाद्या बदनामी मोहिमेसारखे आहे.

Comments are closed.