Latur News – अतिवृष्टीचे पैसे मिळाले नाहीत; कृषी अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये शेतकऱ्याचा जीवन संपवण्याचा प्रयत्न

अहमदपुर तालुक्यातील ढाळेगाव थेथील शेतकरी सुभाष पडीले यांनी कृषी अधिकारी कार्यालयतच अतिवृष्टीचे आनुदान मिळाले नाही म्हणून सिलिंग फॅनला आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने तालुक्यात कळबळ उडाली आहे.
मे महिन्यात अतिवृष्टी झाली, त्यात रब्बी पिकाचे नुकसान झाले, त्याची तात्कालीन मंडळ अधिकारी , तलाठी कृषी सहाय्यक यांनी गावातील हॉटेलवर बसून पंचनामे केल्याचे सांगण्यात आले. यामध्ये फक्त जवळच्या लोकाची यादी तयार करण्यात आली. गावातील फक्त 36 शेतकऱ्यांना अनुदान मिळाले. उर्वरीत 200 शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. ज्यांना अनुदान मिळाले आहे ते कोरडवाहू शेतकरी आहेत, पण रब्बी पेरणारे शेतकरी वंचित राहीले आहेत.
अनुदानापासून वंचित राहीलेले सर्व शेतकरी निवेदन घेऊन तहसिल कार्यालय , तालुका कृषी कार्यालयात आले असता अधिकारी उपस्थित नव्हते. कीन गांव मंडळाचे अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. सुभाष पडीले या तरुण शेतकऱ्याने सिलींग फॅन थांबवून अंगावरील सदऱ्याच्या सहाय्याने फाशी घेण्याचा प्रयत्न केला असता तिथे सोबत असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांना बाजूला केले. हा फाशी घेण्याचा प्रयत्न कार्यालयतील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोर घडला पण कोणीही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
Comments are closed.