लिलावात नाही घेतलं? आता IPL मध्ये शार्दुल या संघासाठी खेळताना दिसणार

मागच्या दिवसात आयपीएलच्या मेगा लिलावात शार्दुल ठाकूरवर कोणती बोली लागली नाही. या अष्टपैलू खेळाडूला खरेदी करण्यासाठी कोणताही संघ पुढे आला नाही. पण आता शार्दुल ठाकूर बद्दल एक मोठी माहिती समोर आहे. आता या हंगामात शार्दुल ठाकूर लखनऊ सुपर जायंट्स संघात खेळताना दिसू शकतो. लखनऊ सुपर जॉईंटसच्या कॅम्पमध्ये ठाकूर सराव करताना दिसला. त्यानंतर सातत्याने हे प्रश्न उपस्थित होत आहेत की, शार्दुल ठाकूर लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी खेळेल. लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादव आणि मोहसीन खान यांच्या फिटनेस वर अजून प्रश्नचिन्ह उपस्थित आहे.

रविवारी लखनऊ सुपर जायंट्सच्या कॅम्पमध्ये शार्दुल ठाकूर ट्रेनिंग करताना दिसला. यादरम्यान शार्दुल ठाकूर लखनऊ सुपर जायंट्स संघाच्या जर्सीमध्ये होता. सोशल मीडियावर शार्दुल ठाकूरचा व्हिडिओ वेगाने वायरल होत आहे. पण अजूनही लखनऊ सुपर जायंट्स संघाने अधिकृतरित्या कोणतीही घोषणा केली नाही. असं मानलं जात आहे की, लखनऊ सुपर जायंट्सने शार्दुल ठाकूरला संघामध्ये आयपीएल स्पर्धेसाठी घेतले आहे. आयपीएल 2024 संघात खेळत होता, पण यानंतर सीएसकेने त्याला बाहेर केले. तसेच मेगा लिलावातही त्याच्यावर कोणतीच बोली लागली नाही.

आयपीएल मेगा लिलावात घरेलू क्रिकेटमध्ये खेळणे सुरू केले. त्याने घरेलू क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली. रणजी ट्रॉफी 2024- 25 हंगामात मुंबईसाठी शार्दुल ठाकूर सर्वात जास्त विकेट घेणारा दुसरा गोलंदाज ठरला. शार्दुल ठाकूरने सहा डावात 19 विकेट्स घेतल्या. याशिवाय फलंदाजी मध्येही त्याने चांगली कामगिरी केली. शार्दुलने फलंदाजी मध्ये 275 धावा केल्या. तसेच या हंगामात शार्दुल ठाकूर मुंबईसाठी सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचव्या नंबर वर आहे.

Comments are closed.