ओव्हनची गरज नाही! तव्यावर 10 मिनिटांत चवदार गार्लिक ब्रेड बनवा, रेसिपी लक्षात घ्या

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पिझ्झा, पास्ता, ब्रेड, बर्गर असे स्वादिष्ट पदार्थ खायला आवडतात. मुलांना गार्लिक ब्रेड खूप आवडतो. हॉटेल किंवा कोणत्याही कॅफेमध्ये गेल्यावर सर्वप्रथम लक्षात येते ती म्हणजे गार्लिक ब्रेड. लसूण वापरून बनवलेला सॉस ब्रेडवर पसरून ओव्हनमध्ये बेक केला जातो. हे पदार्थ प्रामुख्याने Zomato, Swiggy इत्यादी वरून मागवले जातात. पण जंक फूड सतत खाणे शरीरासाठी चांगले नसते. यामुळे शरीराचे नुकसान होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ओव्हन न वापरता घरी गार्लिक ब्रेड कसा बनवायचा ते सांगणार आहोत. तुम्ही ही डिश घरी पाहुण्यांसाठी किंवा मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी देखील बनवू शकता. कमीत कमी घटकांसह झटपट पदार्थ बनवायला प्रत्येकाला आवडते. चला जाणून घेऊया गार्लिक ब्रेड बनवण्याची सोपी रेसिपी.(छायाचित्र सौजन्य – istock)
उन्हाळी पेय : उन्हाळ्यात शरीर राहील थंड! खरबूज-मिंट कूलर घरी झटपट बनवा, रेसिपी लक्षात घ्या
साहित्य:
- लसूण पाकळ्या
- मीठ
- तेल
- ब्रेड किंवा पाव
- लोणी
- हिरव्या मिरच्या
- चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो
- कोथिंबीर
- चीज
- तिखट तेल
ब्रेकफास्ट रेसिपी: सकाळच्या नाश्त्यासाठी ५ मिनिटांत काकडीचे सँडविच बनवा, चाय चपातीचा उत्तम पर्याय
कृती:
- ओव्हन न वापरता गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी सर्वप्रथम कढईत तेल गरम करा आणि त्यात बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या लाल होईपर्यंत तळा.
- नंतर थंड केलेला लसूण चमच्याने मॅश करा. नंतर त्यात बटर, हिरवी मिरची, चिली फ्लेक्स, ओरेगॅनो घालून पेस्ट बनवा.
- तयार लसणाचे मिश्रण ब्रेडवर लावा. एका पॅनमध्ये बटर घालून त्यावर ब्रेड ठेवा आणि वर चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो, चीज घालून मंद आचेवर ५ ते ७ मिनिटे कुरकुरीत होईपर्यंत तळा.
- सोप्या पद्धतीने बनवलेला लज्जतदार गार्लिक ब्रेड तयार आहे.
Comments are closed.