टी-20 वर्ल्ड कपमध्ये संधी नाही, पण मोहम्मद शमी आता 'या' मोठ्या स्पर्धेत खेळणार!
2026 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी 20 डिसेंबरला 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या संघात ईशान किशनचे (Ishan kishan) 2 वर्षांनंतर पुनरागमन झाले आहे, परंतु अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohmmed Shami) मात्र डावलण्यात आले आहे. वर्ल्ड कप संघात स्थान मिळाले नसले तरी, शमी आता एका मोठ्या घरगुती स्पर्धेत खेळताना दिसणार आहे.
मोहम्मद शमीची भारताची सर्वात मोठी ‘लिस्ट-ए’ (50 षटकांची) स्पर्धा असलेल्या ‘विजय हजारे ट्रॉफी 2025-26 साठी बंगाल संघात निवड झाली आहे. याआधी त्याने रणजी ट्रॉफी (Ranji trophy) आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (Sayyed Mushtak Ali) बंगालसाठी उत्कृष्ट कामगिरी केली होती. आता तो विजय हजारे स्पर्धेत (Vijay Hajare trophy) आपला जलवा दाखवेल. या संघाचे नेतृत्व अभिमन्यु ईश्वरन (Abhimanyu Ishwaran) करणार असून संघात अभिषेक पोरेल, आकाश दीप आणि मुकेश कुमार यांसारख्या स्टार खेळाडूंचाही समावेश आहे.
मोहम्मद शमीने भारतासाठी शेवटचा सामना चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये खेळला होता. त्यानंतर त्याला भारतीय संघात संधी मिळालेली नाही. चालू हंगामात रणजी ट्रॉफीमध्ये त्याने बंगालसाठी दमदार कामगिरी केली होती, तरीही टी-20 वर्ल्ड कपसाठी निवड समितीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आहे.
विजय हजारे ट्रॉफी 2025-26 साठी बंगालचा संघ: अभिमन्यू इसवरन (कर्ंधर), अनुस्तुप मजुमदार, अभिषेक पोरेल (डब्ल्यूके), सुदीप घरामी, सुमंत गुप्ता, सुमित नाग (डब्ल्यूके), चंद्रहास दास, शाहबाज अहमद, करण लाल, मोहम्मद शमी, आकाश कुमार साहवी, आकाश कुमार साहवी, मुहम्मद शमी, जी. विशाल भाटी, अंकित मिश्रा.
Comments are closed.