Ind vs SA: न पाऊस, न वादळ, तरीही टॉसला झाला उशीर, कारण आले समोर!
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी20 सामना (17 डिसेंबर) रोजी लखनौमध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार टॉस (नाणेफेक) संध्याकाळी 6:30 वाजता होणार होता. मात्र, टॉसला उशीर झाला आहे. विशेष म्हणजे, टॉसला झालेला हा उशीर पाऊस किंवा वादळामुळे नसून धुक्यामुळे झाला आहे. लखनौच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर दाट धुक्यामुळे टॉससाठी विलंब झाला. सध्या पंच मैदानावर जाऊन धुक्याची आणि परिस्थितीची पाहणी करत आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या टी20 सामन्यातून शुभमन गिल बाहेर पडला आहे. ‘क्रिकबझ’ने दिलेल्या माहितीनुसार, पायाला दुखापत झाल्यामुळे गिल हा सामना खेळणार नाही. दुसरीकडे, मैदानातील धुक्याबाबत अंपायर संध्याकाळी 7:30 वाजता पुन्हा एकदा परिस्थितीचा आढावा घेतील. त्यानंतरच सामन्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. सध्या दोन्ही संघ सामना सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
भारतीय संघाची संभावित प्लेइंग इलेव्हन:
अभिषेक शर्मा, सॅमसन, सूर्यकुमार यादव (कर्ंधर), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग.
Comments are closed.