IPL 2025 नंतरही धोनी मैदानावर! 4 वर्ष आणखी खेळणार?

आगामी आयपीएल स्पर्धेच्या 18 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. तत्पूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून 2019 मध्ये निवृत्ती घेतलेला भारतीय खेळाडू एम.एस.धोनी सध्या आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघासाठी खेळत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली त्याने संघाला 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिलेली आहे. आता संघ ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. मागच्या दोन-तीन हंगामापासून अफवा पसरवल्या जात आहेत की, धोनी निवृत्ती घेऊ शकतो. पण तेव्हा हंगाम संपल्यानंतर धोनीने त्या सर्व अफवांना उत्तरे दिली आहेत.

महेंद्रसिंग धोनीची फिटनेस अजूनही चांगली आहे. पण त्याच्या गुडघ्यामध्ये दुखत असल्याने त्याच ऑपरेशन 2023 मध्ये करण्यात आलं होतं. याच कारणामुळे आयपीएलमधून तो रिटायरमेंट घेऊ शकतो.तसेच त्याच्या सोबत खेळत असलेला रॉबिन उथप्पा याने मोठा दावा करत म्हटले आहे की, जर त्याने अजून 4 वर्ष आयपीएल स्पर्धा खेळली तरी आम्ही हैराण नसणार आहे.

आयपीएलच्या मागच्या दोन हंगामात त्याने एकूण 130 चेंडू खेळले आहेत आणि यामध्ये तो चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. या वेळेसही धोनीच्या निवृत्ती बद्दल चर्चा होत आहे खरंच दोन्ही आयपीएल 2025 नंतर खेळणे चालू ठेवेल? सीएसके आणि टीम इंडिया यांच्यासोबत खेळलेला रॉबिन उथप्पा याच म्हणणं आहे की, कोणीही महेंद्रसिंग धोनी यांच्या डोक्यातील विचार समजू शकत नाही.

रॉबिन उथप्पा जिओहॉटस्टार वर म्हणाला, जर तुमच्याकडे ती क्षमता आहे आणि पुढे जाण्याची जिद्द आहे तर मला नाही वाटत की कोणतीही गोष्ट तुम्हाला अडवू शकते. जर धोनीने आयपीएल 2025 हंगामाच्या शेवटी निवृत्ती घेतली तर मला आश्चर्य वाटणार नाही. तसेच जर धोनी पुढचे 4 आयपीएल हंगाम खेळत असेल तरीही मला आश्चर्य वाटणार नाही.

पहिल्या हंगामापासून चेन्नई सुपर किंग्स साठी खेळणारा एम.एस.धोनी दोन वर्ष पुणे सुपरजायंट्स यांच्यासाठी खेळला आहे. यादरम्यान सीएसके वर बॅन लावण्यात आला होता. त्यानंतर धोनी सीएसके मध्ये परत आला. धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईला 5 आयपीएल ट्रॉफी जिंकून दिलेल्या आहेत. धोनीच्या आयपीएल करिअर बद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 264 सामन्यात 5243 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याने 24 अर्धशतक झळकावली आहेत, तसेच त्याचा आयपीएल मधील सर्वाधिक स्कोर 84 धावा आहेत.

Comments are closed.