बाबरी मशिदीच्या बांधकामाला स्थगिती नाही – उच्च न्यायालय

वृत्तसंस्था/ कोलकाता

तृणमूल काँग्रेसमधून निलंबित आमदार हुमायूं कबीर यांना कलकत्ता उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी उच्च न्यायालयाने मुर्शिदाबादमध्ये बाबरी मशीद उभारणी प्रकणी हस्तक्षेप करण्यास नकार दिला. तसेच न्यायालयाने शांतता राखण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचे स्पष्ट केले आहे. कबीर यांनी 6 डिसेंबर रोजी बाबरीसारख्या मशिदीचे काम सुरू करणार असल्याची घोषण केली आहे.

मशिदीसाठी मी पाया रचणार आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मी अत्यंत आनंदी आहे. हा माझा घटनात्मक अधिकार आहे. माझ्याविरोधात उच्च न्यायालयात गेलेल्या लोकांना चोख प्रत्युत्तर मिळाल्याचे कबीर यांनी सांगितले आहे. कबीर यांनी 22 डिसेंबर पर्यंत नवा पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा यापूर्वीच केली आहे.  हा नवा पक्ष पुढील वर्षी होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत 135 उमेदवार उभा करणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच ते लवकरच विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत.

Comments are closed.