डेटवर जायला वेळ नाही, धनुष सोबतच्या लग्नाच्या अफवांनंतर मृणाल झाली व्यक्त
बॉलीवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर तमिळ अभिनेता धनुषसोबत रिलेशनशीपमध्ये असून लवकरच दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चा बऱ्याच कालावधीपासून रंगल्या आहेत. या चर्चांनंतर अखेर अत्रिनेत्री मृणाल ठाकूरने मौन सोडले आहे. धनुषसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चा मृणालने फेटाळून लावल्या आहेत. मृणाल पहिल्यांदाच या अफवांबाबत व्यक्त झाली आहे.
आदिवी शेषसोबतचा ‘डकॉयट’ हा तिचा नवीन चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. मृणाल ठाकूरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, तिचे वैयक्तिक आयुष्य चर्चेत रहावे असे तिला वाटत नाही. मला पडद्यावरच्या माझ्या कामामुळे ओळखले जावे असे वाटते. मी कोणाला डेट करत आहे? या प्रश्नामुळे मला ओळखले जावे असे मला वाटत नाही, असे मृणालने सांगितले. माझ्याकडे डेटिंगसाठी वेळ नाही. माझ्या पायाचा लिगामेंट फाटला आहे आणि एक्स-रे नंतर, मला माझ्या पायावर उपचार करायलाही वेळ मिळाला नाही. वैयक्तिक आयुष्य तर विसरूनच जा, असे पुढे मृणालने नमूद केले.
लोकांना वाटते की हा माझा ‘पीआर’ (PR) स्टंट आहे. म्हणून स्वतःची बाजू मांडण्यासाठी मला एका टीमची नेमणूक करावी लागली. जेव्हा मी प्रेमात पडेन, तेव्हा स्वतः सर्वांना सांगेन. एक ‘पब्लिक फिगर’ म्हणून वावरताना या गोष्टी अपरिहार्य असतात, असेही तिने पुढे नमूद केले. मी इतकी मनमोकळ्या स्वभावाची व्यक्ती आहे की, जर माझ्या एखाद्या मित्राने मला एखादे फूल दिले, तरीही मी त्याचा फोटो पोस्ट करेन. मी माझ्या भावना इतक्या स्पष्टपणे व्यक्त करते, असे मृणालने पुढे म्हटले आहे.
“मला माझ्या कामासाठी ओळखायचे आहे. ती कोणाशी डेटिंग करत आहे हे मला ओळखायचे नाही.
माझ्यावर विश्वास ठेवा माझ्याकडे डेटला वेळ नाही. मला अस्थिबंधन फाटले आहे आणि क्ष-किरणानंतर, मला माझ्या पायावर उपचार करण्यासाठी वेळ मिळाला नाही.”
– अभिनेत्री #मृणालठाकूर | #DACOIT pic.twitter.com/oo5cVyxtOV
— व्हायनोट सिनेमाज (@whynotcinemass_) 15 एप्रिल 2026
Comments are closed.