स्वतःचं वर्ल्ड कप मेडल परिधान करणार प्रतिका रावल! जय शाह बदलणार ICC चा नियम

भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian cricket women’s team) वनडे वर्ल्ड कप 2025 जिंकत इतिहास रचला आहे. हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखालील टीम इंडियानं 2 नोव्हेंबरला झालेल्या फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत पहिल्यांदाच वर्ल्ड कप ट्रॉफी आपल्या नावावर केली.

न्यूझीलंडविरुद्धच्या गट टप्प्यातील निर्णायक सामन्यात शानदार खेळ दाखवणारी भारतीय फलंदाज प्रतिका रावल गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाली होती. तिच्या जागी शेफाली वर्माला (Shefali verma) सेमीफायनल आणि फायनलसाठी संघात घेतले गेले.

संघाबाहेर असूनही प्रतिकाला विजेता पदक (मेडल) मिळाले. यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले, पण प्रतिकाने स्वतः उघड केले की, या सगळ्यामागे ICC चे अध्यक्ष जय शाह (Jay Shah) यांचा मोठा हात होता.

प्रतिका रावल बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात जखमी झाली होती. तिच्या जागी शेफाली वर्माने नंतरचे सामने खेळले. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आयसीसीने सर्व भारतीय खेळाडूंना विनर मेडल दिलं, पण प्रतिका त्यावेळी उपस्थित नव्हती. मात्र, अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेताना ती ते मेडल परिधान करून दिसली, आणि त्यानंतर सोशल मीडियावर तिचा फोटो व्हायरल झाला.

लोकांनी विचारायला सुरुवात केली प्रतिका रावलला मेडल कसं मिळालं, त्यावर प्रतिकाने सांगितलं की, जय शाह यांनी टीम मॅनेजरला संदेश पाठवून तिच्यासाठी स्वतंत्र मेडलची व्यवस्था करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

न्यूज18 शी बोलताना प्रतिकाने सांगितलं, जय शाह सरांनी आमच्या मॅनेजरला मेसेज केला की ते माझं मेडल अरेंज करतील. जेव्हा मला माझं स्वतःचं मेडल मिळालं, तेव्हा मी ते उघडून पाहिलं आणि माझ्या डोळ्यात आपोआप अश्रू आले. मी फार भावूक होणारी व्यक्ती नाही, पण तो क्षण खूप खरा आणि भावनिक होता.

तिनं पुढे सांगितलं की, जय शाह यांनी तिला आधीच आश्वासन दिलं होतं की मेडल मिळेल, पण त्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.

जय शाह सर म्हणाले होते की, ते ICC शी बोलत आहेत आणि शक्य झालं तर ते मेडल पाठवतील. तोपर्यंत स्टाफमधल्या एका सदस्याने मला आपलं मेडल परिधान करायला दिलं. पण आता माझं स्वतःचं मेडल तयार आहे आणि ते माझ्याकडे येत आहे, असं प्रतिका म्हणाली.

Comments are closed.