ट्रॅव्हिस हेड – शुबमन गिल नव्हे तर ‘हा’ खेळाडू जगातील सर्वोत्तम खेळाडू! ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शचा मोठा खुलासा

ऑस्ट्रेलियाचा टी20 कर्णधार मिचेल मार्शने (Mitchell marsh) अभिषेक शर्माला (Abhishek Sharma) जगातील सर्वोत्तम खेळाडू म्हणत त्याच्या खेळीचे कौतुक केले आहे. त्याने म्हटलं की, त्याची टीम या डावखुऱ्या भारतीय फलंदाजाविरुद्ध सामना खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.

भारताने वनडे मालिका 2-1 ने जिंकली आहे आणि आता सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखालील टीम इंडिया आणि कांगारू टीम यांच्यात 5 सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 29 ऑक्टोबरला कॅनबेरा येथे होईल. भारताचा उद्देश ही मालिका जिंकून आपलं वर्चस्व कायम ठेवण्याचा असेल.

मालिकेपूर्वी बोलताना मिचेल मार्शने अभिषेक शर्माच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील झपाट्याने झालेल्या प्रगतीचं कौतुक केलं. त्याने म्हटलं,अभिषेक एक अविश्वसनीय खेळाडू आहे. तो सुरुवातीपासूनच सामन्याचा टोन सेट करतो. मागच्या काही काळात त्याने सनरायझर्स हैदराबादसाठी अप्रतिम खेळ केला आहे. तो आमच्यासाठी नक्कीच एक मोठं आव्हान ठरेल, पण आम्हालाही जगातील सर्वोत्तम खेळाडूविरुद्ध खेळून स्वतःला आजमावायचं आहे. आम्ही त्याची आतुरतेने वाट पाहतो आहोत.

भारताकडून टी20 पदार्पण केल्यापासून अभिषेकने आतापर्यंत 23 डावांमध्ये दोन शतकं आणि 5 अर्धशतकं झळकावत 36.91 च्या सरासरीने 849 धावा केल्या आहेत. 926 रेटिंग पॉइंट्ससह तो सध्या जगातील क्रमांक-1 टी20 फलंदाज आहे.

याशिवाय मिचेल मार्शने या मालिकेसाठी जोश इंग्लिश (Josh English) उपलब्ध असल्याचंही सांगितलं. पिंडरीच्या दुखापतीमुळे इंग्लिश न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत खेळू शकला नव्हता. मार्श म्हणाला, होय, इंग्लिश पूर्णपणे फिट आहे आणि तो आमच्यासाठी उपलब्ध आहे. तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. बहुधा तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी20 सामन्यांमध्ये भारतातचं पारडं जड राहिलं आहे. दोन्ही संघ आतापर्यंत 32 टी20 सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत, त्यापैकी भारताने 20 सामने जिंकले आहेत. एवढंच नव्हे, तर भारताने 2024 टी20 विश्वचषकातील शेवटचा सामना आणि मागील तीन टी20 मालिका देखील ऑस्ट्रेलियावर मात करत जिंकल्या आहेत.

Comments are closed.