Notice and fine of Rs 90,000 issued to those dumping debris in the open rrp


बोरिवली येथे झाशीची राणी तलाव परिसरातील इक्सार मेट्रो स्थानकाजवळील भूखंडावर अनधिकृतपणे डेब्रिज टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्याची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाने संबंधित व्यक्तीला नोटीस बजावत त्याला 90 हजार रुपये इतका दंड ठोठावला आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर कुठेही उघड्यावर ‘डेब्रिज’ टाकण्यास मनाई केली आहे. तसेच, महापालिकेने डेब्रिजची विल्हेवाट लावण्यासाठी ‘डेब्रिज ऑन कॉल’ सेवा, ऑन लाइन सेवा सुद्धा उपलब्ध केली आहे. मात्र तरीही बोरिवली येथे झाशीची राणी तलाव परिसरातील इक्सार मेट्रो स्थानकाजवळील भूखंडावर अनधिकृतपणे डेब्रिज टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्याची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाने संबंधित व्यक्तीला नोटीस बजावत त्याला 90 हजार रुपये इतका दंड ठोठावला आहे. (Notice and fine of Rs 90,000 issued to those dumping debris in the open)

मुंबईत रस्त्यावर, रस्त्यालगत, चौकाच्या ठिकाणी, मोकळ्या ठिकाणी कुठेही गुपचूपपणे वाहनाद्वारे डेब्रिज टाकण्यात येते. त्यामुळे धुळीच्या प्रदूषणात आणि कचऱ्यात तेवढीच भर पडते. त्याबाबत पालिकेकडे नागरिक तक्रारी करतात. परिणामी पालिकेला वाहन पाठवून ते डेब्रिज उचलून त्याची विल्हेवाट लावावी लागते. त्यासाठी पालिकेला मनुष्यबळ आणि यंत्रणा वापरावी लागते. त्यासाठी पालिकेला उगाचच आर्थिक भुदंड बसतो. त्यावर महापालिकेने वरीलप्रमाणे डेब्रिजबाबत सेवा जाहीर केली. तसेच, दहिसर येथे डेब्रिजवर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी व त्याचा पुनर्वापर करण्यासाठी वेगळा प्रकल्प दोन हजार कोटी रुपये खर्चून सुरू केला आहे.

– Advertisement –

हेही वाचा – Passing Policy : 5 वी आणि 8 वीत नापास झालात तर…; केंद्रीय शिक्षण विभागाने बदलले नियम

अगदी, 500 किलोपर्यंत घरगुती ‘डेब्रिज’ उचलणे, त्याची वाहतूक करणे आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने कंत्राटदार नेमला असून ही सेवा मोफत उपलब्ध केली आहे. मात्र तरीही बोरिवली (पश्चिम) येथील झाशीची राणी तलाव परिसरातील इक्सार मेट्रो स्थानकाजवळील भूखंडावर अनधिकृतपणे डेब्रिज टाकण्यात आले असल्याचे निदर्शनास येताच महापालिकेच्या आर/मध्य विभाग कार्यालयाकडून कडक कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत संबधितांना नोटीस आणि 90 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच पोलिसांतही तक्रार देण्यात आली आहे. याबाबत आर/मध्य विभाग कार्यालयाकडून पथकाची नेमणूक करण्यात आली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.

– Advertisement –

हेही वाचा – Vadapav Price Hike : गरिबांचा घास महागणार; बेकरी चालकांमुळे वडापावची किंमत वाढण्याची शक्यता


Edited By Rohit Patil



Source link

Comments are closed.