प्रशिक्षणास गैरहजर 285 निवडणूक कर्मचाऱ्यांना नोटीस

भिवंडी – निवडणूक यंत्रणेसाठी सर्व शासकीय कार्यालयांतून कर्मचारी वर्ग उपलब्ध करून दिला जातो. पण अनेक वेळा या राष्ट्रीय कर्तव्याच्या कार्यात दांडी मारणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. भिवंडीत निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास अनुपस्थित 285 कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

भिवंडी महानगरपालिका निवडणुकीसाठी4500 कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्यासाठी मंगळवारी प्रशिक्षण आयोजित करण्यात-आले होते. यावेळी मतदान केंद्रप्रमुख 74, मतदान अधिकारी 1 69, मतदान अधिकारी 2-56 मतदान अधिकारी 3 86 असे तब्बल 285 अधिकारी, कर्मचारी गैरहजर होते. या सर्वांना निवडणूक कर्तव्य बजावले नाही म्हणून पालिका निवडणूक विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

Comments are closed.