कुख्यात गुंड अझरबैजानमधून प्रत्यार्पित

मेंका सिंग आता झारखंड

वृत्तसंस्था/ रांची

झारखंड एटीएसने एक मोठी कारवाई करताना कुख्यात गुंड मयंक सिंग उर्फ सुनील मीणाला अझरबैजानमधून प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर रांचीला आणले आहे. झारखंड, राजस्थान, पंजाबसह अनेक राज्यांमध्ये मयंक सिंगवर 50 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तो बऱ्याच वर्षांपासून ‘वॉन्टेड’ यादीत समाविष्ट होता. झारखंड एटीएसचे एसपी ऋषव कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील एक पथक प्रत्यार्पणाअंतर्गत आवश्यक कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी अझरबैजानला गेले होते. तेथून मयंक सिंगला भारतात परत आणण्यात आले. या प्रत्यार्पण प्रक्रियेदरम्यान येथील बिरसा मुंडा विमानतळावर कडक देखरेख आणि सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

झारखंड पोलिसांच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रत्यार्पणाची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची माहिती रविवारी पोलीस अधीक्षक ऋषव कुमार झा यांनी दिली. परदेशातील इतर गुन्हेगारांनाही लवकरच प्रत्यार्पण किंवा हद्दपारीद्वारे भारतात आणले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मयंक सिंगचे प्रत्यार्पण ही एक महत्त्वाची कामगिरी होती. यासाठी आम्ही राज्याचे डीजीपी, मुख्यमंत्री आणि राज्य आणि केंद्र सरकारच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments are closed.