आता अमेरिकेच्या लष्करात एआयचा वापर, सॅम ऑल्टमनने केली पेंटागॉनशी हातमिळवणी
एआय आता लष्करी क्षेत्रात पाऊल टाकतंय. यादृष्टीने ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी अमेरिकेच्या संरक्षण विभागाशी, पेंटागॉनशी करार केला आहे. या करारानुसार अमेरिकेचे एआय मॉडेल्स आता अमेरिकन सैन्याची सुरक्षितता आणि गुप्त नेटवर्कवर काम करतील.
‘एक्स’वर घोषणा करताना सॅम ऑल्टमन म्हणाले की, जग हे गुंतागुंतीचे आणि धोकादायक आहे. म्हणूनच सुरक्षेसाठी लष्करासाठी भागीदारी आवश्यक आहे. यासाठी दोन्ही बाजूंनी तयारी झाली आहे. ऑल्टमन यांनी स्पष्ट केले की, हे मॉडेल क्लाऊडवर आधारित असेल. या करारात ओपनएआयने लष्करी एआय वापरावर काही मर्यादा निश्चित केल्या आहेत. याआधी स्पर्धक कंपनी अँथ्रोपिकने अशाच काही नियमांची मागणी केली होती, पण ती मान्य न झाल्याने ट्रम्प सरकारने अँथ्रोपिक कंपनीला ब्लॅकलिस्ट केले आणि त्यांचे एआय वापरणे बंद केले. त्यानंतर आता ओपनएआय कंपनीने ही संधी उचलली. एआय सैन्यात गेल्याने नैतिकता आणि सुरक्षेचे प्रश्न उद्भवतील, अशी नाराजीदेखील व्यक्त होऊ लागली आहे.
Comments are closed.