आता मोफत पाहता येणार भारत-ऑस्ट्रेलिया वनडे! जाणून घ्या कसं
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 वनडे सामन्यांची मालिका 19 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नंतर भारतीय संघ प्रथमच वनडे मालिका खेळणार आहे. ही मालिका खास आणि लक्षात राहणारी ठरणार आहे, कारण शुबमन गिल पहिल्यांदाच भारतीय वनडे संघाचे नेतृत्व करणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे देखील 7 महिन्यांनंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसणार आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेत (India vs Australia ODI Series Schedule) पाहण्यासारख्या अनेक गोष्टी असतील. पण प्रश्न असा आहे, तुम्ही हा अफलातून क्रिकेट अॅक्शन मोफत पाहू शकणार का? जाणून घ्या कसे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेतील तीन सामने अनुक्रमे पर्थ (19 ऑक्टोबर), अॅडलेड (23 ऑक्टोबर) आणि सिडनी (25 ऑक्टोबर) येथे खेळले जाणार आहेत. हे तिन्ही सामने भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता सुरू होतील.
वनडे मालिकेतील सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहायला मिळेल. तर भारतीय चाहत्यांना जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रिमिंगचा आनंद घेता येईल.
खूप लोकांना हे माहीत नसेल की जेव्हा ते आपला मोबाईल सिम रिचार्ज करतात, तेव्हा त्याचबरोबर त्यांना जिओहॉटस्टारचे मोफत सब्स्क्रिप्शनदेखील मिळते. मात्र, जिओहॉटस्टारचे सब्स्क्रिप्शन सर्व प्लॅनसोबत येत नाही. उदाहरणार्थ, दिवसांसाठी असलेल्या 349 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये जिओहॉटस्टारचे मोफत सब्स्क्रिप्शन मिळते. त्यामुळे तुम्ही जिओहॉटस्टारचा वेगळा प्लॅन न घेता भारत-ऑस्ट्रेलिया सामना मोफत पाहू शकता. तर पहिला वनडे सामना दूरदर्शनवर मोफत प्रसारित केला जाणार आहे.
Comments are closed.