NSA अजित डोवाल सौदी अरेबियात; महत्त्वाच्या विषयावर वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी
हिंदुस्थानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी सौदी अरेबियाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे. या भेटी दरम्यान द्विपक्षीय संबंध, प्रादेशिक परिस्थिती आणि दोन्ही देशाच्या परस्पर हिताच्या इतर विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याचे कळते आहे.
रविवारी NSA अजित डोवाल हे रियाधमध्ये पोहोचले. यावेळी विमानतळावर हिंदुस्थानातील सौदी अरेबियाचे राजदूत सुहेल खान आणि सौदी अरेबियाचे राजकीय व्यवहारविषयक उपमंत्री सौद अल-सती यांनी त्यांचे स्वागत केले. आपल्या या दौऱ्यादरम्यान डोवाल यांनी सौदीचे परराष्ट्र मंत्री फैसल बिन फरहान, ऊर्जा मंत्री अब्दुलअजीज बिन सलमान आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मुसाद अल-ऐबान यांच्याशी भेट घेतली. या भेटीदरम्यान महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.
Comments are closed.